शनिवारवाड्यात असणाऱ्या कबरी बाहेर पोलिसांनी वाढवला बंदोबस्त
काल हिंदू संघटनांनी आणि भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी या कबरी विरोधात केलं होतं आंदोलन
शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्यानंतर आंदोलन करण्यात आलं होतं
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी वाढवला बंदोबस्त
हिंदू संघटनांकडून ही कबर हटवण्यासाठी ८ दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे
या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
"ज्या घटनेशी माझा काही संबंध नव्हता, त्या घटनेवरून सलग २५० दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझी ट्रायल चालली. त्या दिवसांत मी दोनदा मरता मरता वाचलो. आज मी तुमच्या आशीर्वादामुळेच तुमच्यासमोर उभा आहे," अशा शब्दांत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी आपली भावनिक खंत व्यक्त केली.
रायगडच्या म्हसळ्यामध्ये शिवसृष्टी उभी राहत आहे. म्हसळा तहसिल कार्यालयाच्या जागी हि शिवसृष्टी उभारली जात असून याच भूमीपुजन खा. सुनील तटकरे व मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळेस संपूर्ण म्हसळा शहरातून ढोलताशा व खालुबाजाच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली तसेच मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
दिवाळी पहाट कार्यक्रमा ऐवजी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना विचारे करणार मदत..
दरवर्षी गडकरी रंगायतन येथील चौकात विचारेंच्या माध्यमातून दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यायचे..
यंदा दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करत चौकात ठिकठिकाणी मदत नवे कर्तव्य दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करून पूरग्रस्तांना मदत करणार अशा आशयाचे लावण्यात आले बॅनर..
तर दुसरीकडे शिंदेंच्या सेनेचे मान्सूनचा तलाव भागात दोन ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे..
जळगाव जिल्ह्यात गेल्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने एकूण तीन लाख ३८ हजार शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१४ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेली होती. तेवढी मदत जिल्हा प्रशासनाला शासनाकडून प्राप्त झालेली आहे. आता तालुकानिहाय नुकसानबाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू झालेले आहे. रविवारी सुटीचा दिवस असूनही तहसील कार्यालयात बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू होते. काही ठिकाणी याद्या तयार होऊन 'डीबीटी'द्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत पाठविण्याचे काम सुरू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.महिन्यात जिल्ह्यात सप्टेंबर अतिवृष्टी व ढगफूटीसदृश पावसासह पुरामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते
राज ठाकरे यांनी 96 लाख खोटे मतदार यादीत असल्याबाबत टीका केली होती याला मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिउत्तर दिल आहे... राज ठाकरे यांनी जर 96 लाख खोटे मतदार असतील तर त्यासाठी त्यांनी पुरावा द्यायला हवा.. आता हरकती घेण्याची मुदत संपून गेली आहे... अशी काही माहिती मनसेकडे आली असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर करावी. निवडणूक आयोगाने देखील प्रत्येक जिल्हा प्रशासनाला अशा काही बाबींनी आढळून आल्या तर अहवाल मागितला होता. चुकीचा असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल. असे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटीलवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय,जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही,असा गर्भित इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. जतचा साखर कारखाना हा सभासदांचा असून तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करू,प्रसंगी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई करणार असल्याचेही आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या राजारामबापू साखर कारखान्याकडे जतचा साखर कारखाना आहे.कारखाना ढापण्यात आला असून तो सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे, अशी भूमिका आता गोपीचंद पडळकर यांनी यंदा राजरामबापू साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही,असा इशारा देत जयंत पाटील यांची कोंडी करण्याची भूमिका घेतली आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात कमाल तापमानात घट झाली असली,तरी दिवसभर उकाडा आणि रात्री गारवा जाणवत आहे.
जिल्ह्यातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पडत असलेल्या पावसामुळे मागील दोन दिवसात ३६ अंशांवर पोहचलेले कमाल तापमान ३२ अंशांपर्यंत खाली आले आहे.
दिवसभरात शिवाजीनगर आणि चिंचवड येथे ३२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
वडगावशेरी आणि बारामती येथे ३१.८, पाषाण परिसरात ३१.२, एनडीए येथे ३०.९, हवेली परिसरात ३०.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
शहरात पुढील दोन दिवस आकाश निरभ्र, तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. जिल्ह्यातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
- दिवाळीत पावसाच्या हजेरीची शक्यता
- नागपूरमधून मान्सून ने माघार घेतली असली तरी ऐन दिवाळीत पावसाची शक्यता
- वातावरण कोरडे असले तरी हलक्याफुलक्या पावसाची शक्यता
- 21 ते 23 दरम्यान विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात हलक्याफुलक्या पावसाची शक्यता
- शेतकरी आणि शहरी भागातील नागरिकांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा.
यवतमाळच्या बाभुळगांव येथील बस स्थानक मार्गावरील इलाबाद बँकेच्या मागे असलेल्या कॉलनीत दोन घरफोड्या झाल्याची घटना उघडकीस आली असून या चोरट्यांनी दोन्ही ठिकाणाहून सोन्या चांदीचे दागिने रोख असा तीस लाखांचा मुद्देमाल लंपास केला या घटनेनंतर नागरिकांमध्ये दहशतीत पसरली आहेत.पोलिसांनी चोरट्याच्या शोधार्थ विविध पथके तपासकामी रवाना केले आहेत.
दिपावलीनिमित्त सोलापुरात यंदा प्रथमच ब्रम्हदेवदादा सहकारी बँकेकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले.सोलापुरातील केएलई प्राशलेच्या प्रणांगणात या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल होत.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाडच्या गाण्याने यावेळी सोलापूरकर मंत्रमुग्ध झाल्याचं चित्र दिसून आलं.कार्तिकीसोबतच पंडित कल्याण गायकवाड आणि कौस्तुभ गायकवाड यांनी सोलापूरकरांना अभंग,भजन,भक्तीगीत आणि सुगम गीतांची मेजवानी दिली.दरम्यान यनिमित्ताने सोलापुरात दिवाळी पहाट कार्यक्रमांना पोषक वातावरण तयार झाल्याचं चित्र निर्माण झाल आहे.
दिवाळीनिमित्त एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे. पिवळ्या आणि भगव्या रंगांच्या झेंडूच्या फुलांनी एपीएमसी बाजार परिसर बहरून निघाला आहे. दिवाळीत झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने नागरिक झेंडू खरेदी करण्यासाठी बाजार परिसरात मोठी गर्दी करत आहेत. सध्या वाशीतील एपीएमसीत कमी प्रतीचा झेंडू 80 ते 100रुपये; तर आकाराने मोठा आणि उत्तम प्रतीचा झेंडू 100 रुपये किलोने विकला जात आहे.
दिवाळीत दारावर झेंडूच्या फुलांचे तोरण, दुकानांची सजावट, वाहनांना झेंडूच्या माळा बांधण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे या वेळी झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा अशी मागणी केली.पुण्यात भाजपने खासदार मेधा ताई यांना आवरा बाबा.शनिवारवाडा ही वास्तू कोणाच्या बापाचा नाही.शनिवारवाडा मराठा साम्राज्य, पेशव्यांचा आहे. पुणेकर सर्व जाती धर्मांचे आहेत. मेधा कुलकर्णी पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांचं वातावरण खराब करत आहेत. जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहे.त्या विसरल्या आहेत की त्या खासदार आहे,अशी टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.
कोथरुडमध्ये नाटकं झाली, आता कसब्यातून येऊन जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्यावरच तातडीने गुन्हा दाखल करा. खासदार ताईला प्रार्थना असो की दुवा करणे असो एकच आहे हे समजत नाही किंवा त्या जाणीवपूर्वक करत आहे. मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यामध्ये येऊन जी नाटकं केली त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे",
यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अतीपावसाने कापूस फुटायलाही प्रदीर्घ कालावधी लागला मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून दरवर्षी दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध व्हायचा मात्र यंदा उत्पादन उशिरा आले,यामुळे सीतादईला विलंब होत आहे. विशेष म्हणजे कापूस वेचणीसाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे.
धाराशिवच्या परंडा नगरपरिषदेत एकाच घराच्या पत्त्यावर 37 मतदारांची नोंद करण्यात आली आहे.विशेष म्हणजे हे मतदार वेगवेगळ्या जाती-धर्माचे समूहाचे आहेत.हिंदू ,मुस्लिम,दलीत,माळी,ब्राह्मण जातीच्या लोकांचा समावेश आहे.यामध्ये उत्तर प्रदेशातून आलेल्या पाच मजुरांचा समावेश असल्याचाही आरोप करण्यात आला.शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच हे घर असल्याचा आरोप आहे.याप्रकरणी नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आली असून याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.