TVS Mileage Bike Saam Tv
बिझनेस

TVS ची ही बाईक देते 65 Kmpl मायलेज, फक्त लूक नाही फीचर्सही हाय क्लास; जाणून घ्या किंमत

TVS Mileage Bike: एंट्री लेव्हल बाईक्सना बाजारात नेहमीच जास्त मागणी असते. या सेगमेंटमध्ये एक डॅशिंग लूकिंग बाईक म्हणजे TVS Radeon. या बाईकमध्ये 65 kmpl चा हाय मायलेज मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे.

Satish Kengar

TVS Radeon Bike:

एंट्री लेव्हल बाईक्सना बाजारात नेहमीच जास्त मागणी असते. या सेगमेंटमध्ये एक डॅशिंग लूकिंग बाईक म्हणजे TVS Radeon. या बाईकमध्ये 65 kmpl चा हाय मायलेज मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. यात 4 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे, जे हाय स्पीड जनरेट करते. याची टॉप स्पीड 95 kmph आहे.

TVS च्या या स्मार्ट बाईकमध्ये 109.7cc हाय पॉवर इंजिन आहे. हे एअर कूल्ड इंजिन आहे, जे लांबच्या मार्गावर लवकर गरम होत नाही.

Radeon चे इंजिन 8.19 PS ची पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. यात अनेक अॅडव्हान्स सुविधा उपलब्ध आहेत. ही बाईक Hero Splendor, Honda Livo आणि Bajaj Discover 110 शी स्पर्धा करते. ही हायस्पीड बाईक आहे.

या TVS बाईकमध्ये डिजिटल क्लस्टर आहे, जे रिअल टाइम मायलेज, सर्व्हिस इंडिकेटर आणि स्पीड दाखवतो. बाईकचे वजन 113 किलोग्रॅम आहे, ज्यामुळे रस्त्यावर नियंत्रण करणे सोपे होते. बाईकमध्ये 10 लिटरची इंधन टाकी आहे. बाईकमध्ये साधा हँडलबार आणि मोठा हेडलाइट आहे. या बाईकची ऑन रोड किंमत 75, 325 रुपये आहे.

TVS Radeon फीचर्स

या बाईकमध्ये USB चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. डिस्क आणि ड्रम ब्रेक दोन्ही पर्याय यात मिळतात. साइड-स्टँड इंडिकेटर आणि चेन कव्हर यात ग्राहकांना मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपुरात ओबीसी विद्यार्थी फेलोशिपच्या मुद्द्यावरून आक्रमक

डिझेल टँकर पेटला; आगीच्या ज्वाळा अन् धुराचे काळेकुट्ट लोट रस्त्यावर पसरत गेले...VIDEO

Bhumi Pednekar Photos: 'दम लगा के हैशा' फेम भूमीचा जलवा, काळ्या ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल

Gossip: गॉसिप करणं फायद्याचं की तोट्याचं? रीसर्चमधील निष्कर्ष एकदा वाचाच!

Saturday Horoscope : हॉस्पिटलायझेशनवर खर्च होईल, तब्येतीची काळजी घ्या; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

SCROLL FOR NEXT