Gold Price Today google
बिझनेस

Gold Rate Today : चांदी तब्बल ₹2,000 ने स्वस्त! सुवर्णनगरीत सोन्याच्या दरातही झाला मोठा बदल; १ तोळ्याचा दर किती?

Gold and Silver Rates Today: आजच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात २०० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदी २००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. जुलैमधल्या ताज्या सोनं-चांदीच्या किंमतीत आणि बाजारातला बदल जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या किंमतींमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चढ उतार पाहायला मिळत होते. आज सोन्‍याच्‍या दरात किरकोळ २०० रूपयांची वाढ झाली आहे. तर चांदी दोन हजाराने घसरण झालेली आहे. जळगावात गेल्‍या आठवड्यात सोने– चांदीच्‍या दरात मोठी घसरण झाल्‍याचे पाहण्यास मिळाले होते.

सध्‍या सोने व चांदीच्‍या दागिन्‍यांना मागणी कमी झाली आहे. आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेतील बदलामुळे सोन्या-चांदीच्‍या भावात चढ-उतार होत आहे. त्‍यानुसार सोन्‍याच्‍या भावात दोनशे रुपयांनी वाढ, आज तर चांदीत दोन हजार रुपयांची घसरण झाली . सोनं एक लाख ४१ हजार ९०० रुपयांवर (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) दोन लाख वीस हजार त्यात चांदी दोन रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर घसरले आहे.

जुलै महिन्यातील सोन्या-चांदीचे भाव

तारिख सोने (प्रतिदहा ग्रॅम)--- चांदी (प्रतिकिलो विनाजीएसटी)

९ जुलै- १ लाख ४३ हजार ५००- २ लाख २७ हजार

१० जुलै- १ लाख ४३ हजार- २ लाख २३ हजार

११ जुलै- १ लाख ४३ हजार- २ लाख २४ हजार

१२ जुलै- १ लाख ४२ हजार- २ लाख २२ हजार

१३ जुलै- १ लाख ४२ हजार- २ लाख २२ हजार

१४ जुलै- १ लाख ४१ हजार- २ लाख २२ हजार

१५ जुलै- १ लाख ४१ हजार ८००- २ लाख २२ हजार

१६ जुलै- १ लाख ४१ हजार ५००- २ लाख २२ हजार

१७ जुलै १ लाख ४१ हजार ९०० तर चांदी २ लाख २० हजार

तसेच आज Goodreturns नुसार २४ कॅरेटच्या १ तोळ्याच्या किंमतीत ७६० रुपयांची घसरण झाली होती. तर याची किंमत १,४२,५३० इतकी आहे. २४ कॅरेटसोबत २२ आणि १८ कॅरेटच्या किंमतती घसरण झाली. तर चांदीमध्ये ५ रुपयांनी घसरण झाली आहे. तर चांदी  २,३०,००० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गेल्या 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सातपुड्यात पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

MPSC Exam Update: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; नवी तारीख काय?

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT