सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून वाढ होत आहे. सोन्याचे भाव जवळपास १ लाखांपेक्षा जास्त झाले होते. त्यानंतर आता आज पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. प्रति तोळ्यामागे ५० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
आता ऑगस्ट महिन्यापासून सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होणार आहे. या दिवसात अनेकजण सोने खरेदी करतात. परंतु सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचे सोन्याचे दर
आजचे सोन्याचे भाव
आज सोन्याचे दर प्रति तोळा ५० रुपयांनी वाढले आहेत.८ ग्रॅम सोन्याचे दर ७९,५०४ रुपये आहेत. २४ कॅरेट (24k Gold Rate)सोन्याचे दर ९९,३८० रुपये प्रति तोळा आहेत. १० तोळ्यामागे ५५० रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळ्याचे दर ९,९३,८०० रुपये आहेत.
२२ कॅरेट (22k Gold Rate)
आज २२ कॅरेट सोन्याचे दर ९१,१०० रुपये प्रति तोळा आहे.२२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील ५० रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळो सोन्याचे दर ९,११,००० रुपये झाले आहेत. या दरात ५००० रुपयांनी वाढ झाली आहे.
१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)
आज १८ कॅरेट सोन्याचे दर ७४,५४० रुपये प्रति तोळा आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५९,६३२ रुपये आहेत. तर १० तोळा सोन्याचे दर ७,४५,४०० रुपये आहेत.
चांदीचे दर (Silver Rate)
आज चांदीच्या दरात फार काही बदल झालेला नाही. चांदीचे दर स्थिर आहेत. ८ ग्रॅम चांदीची किंमत ९११.२० रुपये आहेत. १० ग्रॅम चांदीचे दर १,१३९ रुपये आहेत. तर १०० ग्रॅम चांदीचे दर ११,३९० रुपये आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.