Gold- Silver Price Today Saam Tv
बिझनेस

Gold price today : आजही सोनं महागलं; मुंबई, पुण्यात 22k, 24k ची किंमत किती? वाचा लेटेस्ट दर

Today gold price in Mumbai and Pune 22K and 24K : आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि अमेरिका-युरोप व्यापार युद्धाच्या शक्यतेमुळे सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.

Namdeo Kumbhar

24K , 22K Gold price today in Mumbai Pune India :सराफा बाजार उघडताच आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीने उसळी घेतली आहे. देशांतर्गत बाजारासह आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर पुन्हा एकदा उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अमेरिका-युरोप व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाण सोन्यावर झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितलेय. त्यामुळेच भारतातही सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. मुंबई, पुण्यापासून दिल्ली आणि चेन्नई कोलकत्यामध्ये सोन्याचे दर वाढल्याचे दिसतेय.

भारतात आज सोन्याची किंमत किती ?

सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली. मुंबई, पुम्यात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१४,७२८ आहे. सोमवारच्या तुलनेत यामध्ये १०४ रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ९५ रूपयांनी वाढून प्रति ग्रॅम ₹१३,५०० रूपये झाली आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमतप्रति ग्रॅम ₹११,०४६ इतकी झाली आहे. सोमवरच्या तुलनेत ही किंमत ७८ रूपयांनी जास्त नोंदवण्यात आली.

२४ कॅरेट सोन्याचा दर किती ?

देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत उसळी झाली. सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १०४० रूपयांनी वाढली आहे. आज मार्केटमध्ये २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १,४७,२८० रुपयांना मिळेल. तर प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४,७२८ रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर

२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १,३५,००० रुपये इतकी आहे. सोमवारच्या तुलनेत सोन्यामध्ये ९५० रुपयांनी वाढ नोंदवण्यात आली. २२ कॅरेट सोन्याची किंमत ९५ रूपयांनी वाढून प्रति ग्रॅम १३,५०० रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव

आज, १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹११,०४६ झाली आहे. प्रति तोळा १८ कॅरेटचे सोनं ₹१,१०,४६०रूपयांना झालेय. यामध्ये ७८० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली.

तुमच्या शहरात सोन्याचे दर किती?

मुंबई, पुणे: २४ कॅरेट - ₹१,४६,२५० | २२ कॅरेट - ₹१,३४,०६० | १८ कॅरेट - ₹१,०९,६९०

दिल्ली: २४ कॅरेट - ₹१,४६,४०० | २२ कॅरेट - ₹१,३४,२१० | १८ कॅरेट - ₹१,०९,८४०

कोलकाता: २४ कॅरेट - ₹१,४६,२५० | 22 कॅरेट - ₹1,34,060 | 18 कॅरेट - ₹1,09,690

चेन्नई: २४ कॅरेट - ₹१,४६,७४० | २२ कॅरेट - ₹१,३४,५१० | १८ कॅरेट - ₹१,१२,३१०

बेंगळुरू: २४ कॅरेट - ₹१,४६,२५० | 22 कॅरेट - ₹1,34,060 | 18 कॅरेट - ₹1,09,690

हैदराबाद: २४ कॅरेट - ₹१,४६,२५० | २२ कॅरेट - ₹१,३४,०६० | १८ कॅरेट - ₹१,०९,६९०

पटना: 24 कॅरेट - ₹1,46,300 | 22 कॅरेट - ₹1,34,110 | 18 कॅरेट - ₹1,09,740

जयपूर: 24 कॅरेट - ₹1,46,400 | 22 कॅरेट - ₹1,34,210 | 18 कॅरेट - ₹1,09,840

अहमदाबाद: २४ कॅरेट - ₹१,४६,३०० | २२ कॅरेट - ₹१,३४,११० | १८ कॅरेट - ₹१,०९,७४०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neha Kakkar Divorce: लग्नाच्या ५ वर्षांनंतर नेहा कक्करचा होणार घटस्फोट? म्हणाली, "माझा नवरा..."

Maharashtra Live News Update: पुण्यात उद्या सायकल स्पर्धेनिमित्त काही रस्ते बंद

Mayor Election : राजकारण फिरणार! काँग्रेस फोडणार भाजपचे नगरसेवक?

Bigg Boss Marathi 6 : टोळीत फूट! रुचिताने थेट 'या' सदस्याला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून दाखवला बाहेरचा रस्ता, पाहा VIDEO

Bridal Jewellery Set: लग्नात नवरीसाठी ट्रेडिंगचे 5 ज्वेलरी सेट, कोणत्याही साडीवर उठून दिसतील

SCROLL FOR NEXT