Best Electric Scooters Saam Tv
बिझनेस

विना Licence च्या चालवता येणार या 5 Best Electric Scooters, वाचा सविस्तर

Best Electric Scooters In India : दैनंदिन प्रवासासाठी दुचाकी वाहने भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. जरी आज बाजारात अनेक ईव्ही स्कूटर उपलब्ध आहेत. काही इलेक्ट्रिक स्कूटर अशा आहेत ज्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासणार नाही.

Shraddha Thik

Best Electric Scooters Without Licence :

दैनंदिन प्रवासासाठी दुचाकी वाहने भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. जरी आज बाजारात अनेक ईव्ही स्कूटर उपलब्ध आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की, काही इलेक्ट्रिक स्कूटर (Scooter) आहेत ज्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासणार नाही. अशा स्कूटरची लोकप्रियता देखील देशात वेगाने वाढत आहे.

फक्त 25 किमी/तास वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रिक (Electric) स्कूटरसाठी तुम्हाला कोणत्याही ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासणार नाही. आज आम्ही तुमच्यासाठी भारतात उपलब्ध असलेल्या अशा काही इलेक्ट्रिक स्कूटरची यादी घेऊन आलो आहोत ज्या तुम्ही कोणत्याही ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय चालवू शकता. जाणून घेऊया...

Hero Electric Flash

भारतात 59,640 रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत उपलब्ध आहे. हे एका लहान 250W BLDC हब मोटरसह सुसज्ज आहे जे तुम्हाला फक्त 25 किमी/ताशी टॉप स्पीज देते. ही 28AH लीड-एसीटेट बॅटरीसह सुसज्ज आहे जी हीरो ई-स्कूटरला 50 किमीची रेंज देते.

Deltic Drixx

भारतात 58,490 रुपये ते 84,990 रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला 1.58 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळेल जो 70 किमी ते 100 किमी दरम्यानची रेंज ऑफर करतो. या स्कूटरचा टॉप स्पीड देखील 25 किमी/तास आहे.

Komaki XGT KM

भारतात रु. 56,890 ते रु. 93,045 (एक्स-शोरूम) या किमतीत खरेदी करू शकता. ही 20-30Ah लीड ऍसिड बॅटरीसह येते जी एका चार्जवर 85 किमीची रेंज देते.

Okinawa R30

भारतात रु. 61,998 (एक्स-शोरूम) च्या किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला 1.25kWh लिथियम-आयन बॅटरी मिळते जी 60 किमीची ड्रायव्हिंग रेंज ऑफर करण्यास मदत करते आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात.

Kinetic Zing

तुम्ही भारतात Rs 71,990 ते Rs 84,990 (एक्स-शोरूम) मध्ये खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला 22AH बॅटरी मिळत आहे. जे 100 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. या सर्व इलेक्ट्रिक स्कूटर चालविण्यासाठी हेल्मेट आवश्यक आहे परंतु परवान्याची आवश्यकता नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT