ऑटोमोबाईल उद्योगात अनेक कंपन्या वेगवेगळे प्रयोग करत आहेत. यामध्येच आता हिरोचे नावही सामील झाले आहे. हिरोने असे एक इलेक्ट्रिक वाहन सादर केले आहे, जे तीन चाकी आणि दुचाकी दोन्हीचे काम करते.
सोप्या शब्दात बोलायचं झालं तर, ते तीनचाकी ते दुचाकीमध्ये रूपांतरित होते. एवढेच नाही तर ही एक मालवाहू तीन चाकीही आहे. उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही या जबरदस्त स्कूटरचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हिरोने स्कूटरला सर्ज (SURGE ) असे नाव दिले आहे. कंपनीची ही SURGE S32 सिरीज आहे. SURGE S32 हे जगातील पहिले क्लास-शिफ्टिंग वाहन आहे. गोयंका यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला कल्पना येऊ शकते की, ही स्कूटर खूपच पॉवरफुल आहे. सध्या याची किंमत आणि लॉन्चिंग तारखेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Latest Marathi News)
या मालवाहू तीन चाकीच्या आत एक स्कूटर फिट केलेली आहे. जी यापासून वेगळीही करता येते. सुरुवातीला समोरच्या सीटवर 2 लोक बसण्याची क्षमता असलेली ही तीन चाकी आहे. कंपनी या सिरीजचे एकूण 4 व्हेरियंट लॉन्च करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दुचाकी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 10 Kw पॉवर मिळते. मात्र ही तीन चाकीमध्ये रूपांतरित झाल्यानंतर यामध्ये 11 Kwh ची पॉवर मिळते. याचा कमाल वेग ताशी 50 किलोमीटर आहे. ही स्कूटर 500 किलो वजन वाहून नेऊ शकते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.