देशात रिलायन्स जिओकडे सर्वाधिक 44 कोटी ग्राहक आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार कंपनीचे विविध प्रकारचे प्रीपेड प्लान ऑफर करते. जर तुम्हाला चित्रपट आणि वेब सिरीज पाहायची आवड असेल तर कंपनीने तुमच्यासाठी एक जबरदस्त प्लान आणला आहे.
आम्ही ज्या प्लॅनबद्दल बोलत आहोत, त्यामध्ये प्राइम व्हिडिओ, जिओसिनेमा प्रीमियम आणि डिस्ने + हॉटस्टारसह सर्व 14 OTT सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मोफत उपलब्ध असतील. यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्लानचा रोजचा खर्च सुमारे 12 रुपये असेल. या पैसा वासूल प्लानबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जिओने नुकताच 4498 रुपयांचा प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे. हा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. याची किंमत आणि वैधता पाहिल्यास, या प्लानचा प्रतिदिन खर्चसुमारे 12 रुपये असेल. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळेल म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान एकूण 730GB डेटा उपलब्ध असेल. असं असलं तरी हा 4G डेटा आहे आणि डेटा मर्यादा संपल्यानंतरही ग्राहक 64Kbps स्पीडने इंटरनेट वापरू करू शकतात. (Latest Marathi News)
दरम्यान या प्लानमध्ये एकूण 14 OTT सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 1 वर्षासाठी Prime Video Mobile Edition, 1 वर्षासाठी JioCinema Premium, 1 वर्षासाठी Disney+Hotstar Mobile यांचा समावेश आहे . यासोबतच Sony LIV, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Kanchha Lanka, Planet Marathi, Chaupal, Docubay, EPIC ON आणि Hoichoi यांचाही समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.