मार्च सुरू झाला असून या महिन्याच्या सुरूवातीस, Infinix ने आपल्या ग्राहकांसाठी Infinix Smart 8 Plus लॉन्च केला आहे, हा फोन 6000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. तसेच या आठवड्यात एकामागून एक फोनचे (Phone) लॉन्चिंग लिस्ट होणार असल्याचे एका रिपोर्टनुसार समोर आले आहेत. उद्या म्हणजेच 4 फेब्रुवारीला सॅमसंगसह Nothing, Lava, Vivo, Realme आणि Xiaomi या कंपन्यांचे इतर फोन्सचे लॉन्च होतील.
या आठवड्यात कोणते फोन लॉन्च होणार
Samsung Galaxy F15 5G
Samsung या आठवड्यात आपल्या ग्राहकांसाठी Galaxy F15 5G लॉन्च करत आहे. कंपनी हा फोन 4 मार्चला म्हणजेच उद्या दुपारी 12 वाजता लॉन्च (Launch) होईल. कंपनीने हा फोन फ्लिपकार्टवर लिस्ट केला आहे. किमतीबाबत मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार हा फोन 12 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्हाला घेता येईल.
तपशील
प्रोसेसर – MediaTek Dimensity 6100+ चिपसेट
अपग्रेड - 4 वर्षे OS आणि 5 वर्षे सुरक्षा अद्यतने
बॅटरी - 6000mAh
डिस्प्ले - सुपर AMOLED स्क्रीन
Lava Blaze Curve 5G
Lava या आठवड्यात आपल्या ग्राहकांसाठी Lava Blaze Curve 5G फोन 5 मार्चला दुपारी 12 वाजता लॉन्च होणार आहे. कंपनीने हा फोन Amazon वर लिस्ट केला आहे.
तपशील
चिपसेट - मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 चिपसेट
रॅम आणि स्टोरेज – LPDDR5 8GB RAM + 8GB RAM, UFS 3.1 256GB स्टोरेज
डिस्प्ले - सर्वात कर्व्ह-ओ-ल्यूशनरी 120Hz वक्र AMOLED डिस्प्ले
Nothing Phone 2a
या आठवड्यात नथिंग कंपनीचा तिसरा नवीन फोन ग्राहकांसाठी लॉन्च करत आहे. हा फोन 5 मार्चला संध्याकाळी 5 वाजता लॉन्च होईल. हा फोन कंपनीने फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे.
तपशील
प्रोसेसर - Mediatek Dimensity 7200 Pro चिपसेट
रॅम - 12GB + 8GB रॅम सपोर्ट
Realme 12 5G Series
Realme 12 5G Series देखील या आठवड्यात म्हणजेच 6 मार्च रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होणार आहे. कंपनी या मालिकेत दोन नवीन फोन लॉन्च करत आहेत, Realme 12 5G आणि Realme 12+ 5G. ही Series फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आली आहे.
तपशील
कॅमेरा - Realme 12+ 5G फोन Sony LYT-600 OIS ने सुसज्ज आहे.
डिझाइन - Realme चे आगामी फोन लक्झरी घड्याळाच्या डिझाइनसह येत आहेत.
प्रोसेसर - MediaTek Dimensity 7050 5G
Xiaomi 14
जागतिक लॉन्चनंतर, Xiaomi 14 भारतात लॉन्च 7 मार्चला संध्याकाळी 6 वाजता लॉन्च केला जाणार आहे. फ्लिपकार्टवर फोनची लिस्ट करण्यात आली आहे.
तपशील
चिपसेट - स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3
OS - Xiaomi Hyper OS
डिस्प्ले - 120hz LTPO Amoled, 1.5K रिझोल्यूशन
चार्जिंग - 90W हायपर चार्ज, 50W वायरलेस टर्बो चार्ज
Vivo V30 Series
Vivo या आठवड्यात आपल्या ग्राहकांसाठी Vivo V30 सिरीज लॉन्च करत आहे . या Series मध्ये दोन नवीन फोन Vivo V30 आणि Vivo V30 Pro असे दोन फोन 7 मार्चला दुपारी 12 वाजता लॉन्च केले जात आहेत.
तपशील
कॅमेरा - नवीन फोन V मालिकेत प्रथमच ZEISS इमेजिंग सिस्टमसह येतात.
रंग - फोन क्लासिक ब्लॅक, अंदमान ब्लू आणि पीकॉक ग्रीन शेडमध्ये येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.