Smartphone Tips
Smartphone TipsSaam Tv

Smartphone Tips : स्मार्टफोनमध्ये पाणी गेलयं? घाबरु नका, सोप्या टिप्स फॉलो करा; मिनिटात होईल ठीक

What To Do When Water Get Inside In Smartphone : स्मार्टफोनमध्ये पाणी गेले तर काय कराल. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन सहज दुरुस्त करु शकता.
Published on

How To Remove Water From Mobile :

सध्याच्या जगात स्मार्टफोनशिवाय हल्ली कोणाचेही पान हलत नाही. स्मार्टफोन आजची सर्वात मोठी गरज बनली आहे. दिवसाच्या सुरुवतीपासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकांच्या हातात फोन पाहायला मिळतो.

स्मार्टफोनचा (Smartphone) वापर हल्ली सगळेच जण करतात. पण याच स्मार्टफोनमध्ये पाणी गेले तर काय कराल. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन सहज दुरुस्त करु शकता. स्मार्टफोन पाण्यात पडल्यानंतर तो दुरुस्त करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स (Tips) आहेत.

सगळ्यात आधी तुमचा स्मार्टफोन पाण्यात (Water) पडला तर लगेच बाहेर काढा. पाणी निघाल्यानंतर फोनची स्क्रीन स्वच्छ करा.

1. चार्जिंग करताना काळजी घ्या

फोनमधील पाणी निघाल्यानंतरच चार्जिंग करा. ज्यामुळे सर्किटला नुकसान करु शकते. त्यासाठी चार्जिंग करताना काळजी घ्यावी. फोन पाण्यात पडल्यानंतर स्मार्टफोन योग्यरित्या काम करत नसेल तर रिपेरिंग सेंटरमध्ये जा. ज्यामुळे फोनमधील महत्त्वाच्या गोष्टी मिळतील.

Smartphone Tips
Airtel चा धमाका! 100 रुपयात मिळणार अनलिमिटेड ऑफर, पॉकेट फ्रेंडली प्लान पाहा

2. एअर कंडिशन

स्मार्टफोनमध्ये थोडे पाणी गेले असेल तर एअर कंडिशनरजवळ ठेवा. ज्यामुळे फोनमधील पाणी बाहेर निघण्यास मदत होईल.

3. तांदळाचा वापर

स्मार्टफोनमधील पाणी बाहेर काढण्यासाठी तुम्ही फोन तांदळाच्या डब्ब्यात ठेवू शकतात. यामुळे फोनमध्ये गेलेले पाणी बाहेर निघण्यास मदत होते.

Smartphone Tips
Parenting Tips : पालकांनो, मुलांचा स्क्रीन टाइम वाढलाय? कसे कळेल? या गोष्टी लक्षात ठेवा

4. ब्लोअर ऍप

स्मार्टफोनमधील पाणी बाहेर काढण्यासाठी ब्लोअर ऍपचा वापर करु शकतात. ज्याचा वापर करुन स्पीकरमध्ये गेलेले पाणी बाहेर येण्यास मदत होईल. या सोप्या ट्रिक्स वापरुन तुम्ही फोनमधील पाणी बाहेर काढू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com