सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्डने आज गॅलॅक्सी ए१५ ५जी चा नवीन स्टोरेज व्हेरिएण्ट ६ जीबी + १२८ जीबीच्या लाँचची घोषणा केली. या व्हेरिएण्टची किंमत १६४९९ रूपये आहे. भर करण्यात आलेला नवीन स्टोरेज व्हेरिएण्ट गॅलॅक्सी ए१५ ५जी खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांना अधिक पर्याय देईल. हा स्मार्टफोन सध्या ८ जीबी + २५६ जीबी आणि ८ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असून ब्ल्यू ब्लॅक, ब्ल्यू आणि लाइट ब्ल्यू या तीन आकर्षक रंगांमध्ये येतो.
काऊंटरपॉइण्ट रिसर्चनुसार, गॅलॅक्सी ए१५ ५जी २०२३ साठी भारतातील पहिला विक्री करण्यात आलेला ५जी स्मार्टफोन (Smartphone) गॅलॅक्सी ए१४ ५जी ला मिळालेल्या यशानंतर लाँच करण्यात आला आहे. यामधून किफायतशीर दरात परिवर्तनात्मक इनोव्हेशन्स वितरित करण्याप्रती सॅमसंगची क्षमता दिसून येते, ज्यामुळे हा स्मार्टफोन भारतातील (India) लाखो ग्राहकांची पहिली पसंती बनला आहे.
गॅलॅक्सी ए१५ ५जी मध्ये प्रिमिअम फिलसाठी गॅलॅक्सीचे सिग्नेचर डिझाइन तत्त्व असण्यासह हेज फिनिशमधील ग्लास्टिक बॅक पॅनेल आहे. साइड पॅनेलवरील नवीन प्रमुख आयलँड डिझाइन आणि फ्लॅट लीनियर कॅमेरा सेटअप सुधारित ग्रिपसाठी अद्वितीय सिल्हूट निर्माण करते. गॅलॅक्सी ए१५ ५जी मध्ये ६.५-इंच सुपर एएमओएलईडी डिस्प्ले आहे, ज्यामध्ये व्हिजन बूस्टर आहे, जे ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह सुलभ, प्रखर व वैविध्यपूर्ण व्युईंग अनुभव देते, तसेच लो ब्ल्यू लाइट डिस्प्ले डोळ्यांना आरामदायीपणाची खात्री देतो.
गॅलॅक्सी ए१५ ५जी मध्ये ५० मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअपसह अस्थिर किंवा हालचालींमुळे व्हिडिओंमध्ये येणारे ब्लर किंवा व्यत्यय कमी करण्यासाठी व्हीडीआयएस आहे, तसेच आकर्षक सेल्फीज कॅप्चर करण्याकरिता १३ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा आहे.
गॅलॅक्सी ए१५ ५जी नॉक्स सिक्युरिटी प्लॅटफॉर्मसह येतो, जे वापरकर्त्यांना ऑटो ब्लॉकर, प्रायव्हसी डॅशबोर्ड, सॅमसंग पासकी अशा वैशिष्ट्यांच्या माध्यमातून त्यांच्या डेटावर नियंत्रणाची खात्री देते. या डिवाईसमध्ये चिप लेव्हलवर निर्माण करण्यात आलेले नॉक्स वॉल्ट चिपसेट आहे, जे पिन, पासवर्ड्स व पॅटर्न्स अशा संवदेनशील डेटाचे संरक्षण करण्यासाठी, तसेच सॉफ्टवेअर व हार्डवेअर धोक्यांपासून संरक्षणासाठी स्वतंत्र टेम्पर-रेसिस्टण्ट स्टोरेजसह डिझाइन करण्यात आले आहे.
उच्च दर्जाची प्रायव्हसी व सिक्युरिटी वैशिष्ट्ये असलेला गॅलॅक्सी ए१५ ५जी ओएस अपग्रेड्सच्या जवळपास ४ जनरेशन्स आणि सिक्युरिटी अपडेट्सच्या जवळपास ५ वर्षांसह फ्यूचर-रेडी असण्यास डिझाइन करण्यात आला आहे.
गॅलॅक्सी ए१५ ५जी वॉईस फोकस अशा नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह ग्राहक अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जातो. वॉईस फोकस अद्भुत कॉलिंग अनुभवासाठी आसपास आवाज कमी करते. गॅलॅक्सी ए१५ ५जी अनेक उत्साहवर्धक वैशिष्ट्यांसह येतो, जी गॅलॅक्सी एक्स्पेरिअन्सला उत्साहित करतात. क्विक शेअर वैशिष्ट्य वापरकर्त्यांना त्वरित फाइल्स, फोटो व डॉक्यूमेंट्स इतर कोणत्याही डिवाईसशी, तसेच लॅपटॉप व टॅब्लेटसोबत दुरून किंवा खाजगीरित्या शेअर करण्याची सुविधा देते.
गॅलॅक्सी ए१५ ५जी मध्ये सॅमसंग वॉलेट देखील आहे, जे ग्राहकांना आयडी स्टोअर करण्यासाठी आणि पेमेंट्स सुविधेला नव्या उंचीवर नेण्यासाठी विनासायास अनुभवांचा आनंद देते. गॅलॅक्सी ए१५ ५जी मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६१००+ प्रोसेसरची शक्ती आहे, ज्यामधून एकसंधी मल्टीटास्किंग अनुभवासाठी अधिक पॉवर व स्पीड मिळतो. गॅलॅक्सी ए१५ ५जी मध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी जवळपास दोन दिवसांपर्यंत टिकते आणि २५ वॅट फास्ट चार्जिंग असण्यासह अॅडप्टिव्ह पॉवर-सेव्हिंग मोड आहे, जो आपोआपपणे वापराशी जुळून जात सानुकूल पॉवर सेव्हिंग्जची खात्री देतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.