Thar.e : महिंद्राची इलेक्ट्रिक थार मार्केट गाजवणार; ४५० किमीची रेंज अन् टॉपक्लास फीचर्स खास आकर्षण

Thar.e : महिंद्रा थार ही भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय वाहन आहे. कंपनी या कारचे लवकरच इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या इलेक्ट्रिक व्हर्जनबद्दल काही माहिती समोर आली आहे.
Thar.e
Thar.eSaam Tv
Published On

Mahindra Thar.e Electric Car Features And Specification:

महिंद्रा थार ही भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय वाहन आहे. कंपनीची ही कार साहसी राइडसाठी प्रसिद्ध आहे. कंपनी या कारचे लवकरच इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या इलेक्ट्रिक व्हर्जनबद्दल काही माहिती समोर आली आहे.

महिंद्रा अँड महिंद्राच्या थार कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन येत्या काही वर्षात लाँच करण्याची शक्यता आहे. केपटाउनमध्ये आयोजित फ्युचरस्केप इव्हेंटमध्ये Thar.e चे अनावरण करण्यात आले आहे. (Latest News In Marathi)

Thar.e

Thar.e ही कार सध्या तीन डोअर व्हर्जनमध्ये विकली जात आहे. तर 5 डोअर व्हर्जन २०२४ च्या पहिल्या सहा महिन्यात लाँच करण्यात आली आहे. ही नवीन Thar.e कार ३ डोअर व्हर्जनवर आधारित आहे. या नवीन वाहनामध्ये काही नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

Mahindra Thar.e कारचे काही फोटो समोर आले आहे. यावरुन या कारमध्ये स्क्वेरिश एलिमेंट्स ठेवण्यात येणार असल्याचे दिसत आहे. या वाहनात चौकोनी आकाराच्या एलईडी डे टाइम रनिंग लाइट्ससोबस फ्रंट फेसियामध्ये ग्रिल आणि ट्रिपल हॉरिजॉन्टल एलईडी लाइट स्लैटवर कारचे नाव लिहले आहे. या कारमध्ये ऑलिव्ह व्हील देण्यात आले आहे.

Thar.e
PM Svanidhi Yojana: तरूणांनी लाभ घ्या! फक्त आधारकार्डवर मिळणार कर्ज, केंद्र सरकारची भन्नाट योजना

कारच्या इंटेरिअरमध्ये काही अपडेट करण्यात आले आहे. कारच्या इंटेरिअरमध्ये टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिम कनेक्टिव्हिटीसह एक ऑल डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळणार आहे. याशिवाय टू-स्पोक स्टीअरिंग व्हील मिळणार आहे. Mahindra Thar.e च्या कारबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ही कार ४५० किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम असेल, अशी अपेक्षा आहे.

Thar.e
Today's Gold Silver Rate: गुड न्यूज! सोन्याचा भाव आपटला, चांदीही नरमली; जाणून घ्या आजचे दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com