Richest IAS Saam Tv
बिझनेस

Richest IAS: महिन्याला फक्त १ रुपया पगार घेतात हे IAS अधिकारी; तरीही आहे श्रीमंताच्या यादीत नाव

Richest IAS Amit Kataria: यूपीएससी परिक्षेत पास होऊन आयएएस अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करुन आयएएस अमित कटारिया हे महिन्याला फक्त १ रुपया मानधन घेतात.

Siddhi Hande

यूपीएससी ही सर्वात अवघड आणि प्रतिष्ठित परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करुन सरकारी विभागात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होते. देशातील आयएएस आणि आयपीएस ऑफिसरचे पगारदेखील सर्वाधिक असतात. दरम्यान, देशातील एका अशा आयएएस ऑफिसरबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे महिन्याला फक्त १ रुपया पगार घेतात. तरीही ते देशातील सर्वात श्रीमंत आयएएसपैकी एक आहेत. (Richest IAS Officer Who Get Only 1 Rupees Salary)

IAS अमित कटारिया हे देशातील सर्वात कमी मानधन घेणारे ऑफिसर आहे. अमित कटारिया हे मूळचे गुरुग्रामचे रहिवासी आहेत. अमित कटारिया यांची पोस्टिंह छत्तीसगडमध्ये झाली आहे. ७ वर्षांच्या केंद्रिय प्रतिनियुक्तीवरुन ते परतले आहेत. ते देशातील सर्वात श्रीमंत आयएएस ऑफिसरपैकी एक आहेत.

अमित कटारिया यांच्या जन्म व्यापारी कुटुंबातील आहे. त्यांचा रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसाय आहे. या व्यवसायातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळते. त्यांनी संपत्ती ८ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अमित कटारिया हे महिन्याला फक्त १ रुपये पगार घेतला. त्यांच्या पत्नीचे नाव अस्मिता हांडा आहे. त्यादेखील व्यावसायिक पायलट आहेत. त्यांचा पगारदेखील लाखो रुपयांमध्ये आहे. (Richest IAS Officer)

अमित कटारिया यांनी IIT दिल्लीमधून बीटेकचे शिक्षण घेतले. त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन १८वा क्रमांक मिळवला. ते नेहमीच चर्चेत असतात.त्यांनी घेतलेली प्रंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट असो किंवा त्यांचा पगार या गोष्टींवरुन ते नेहमी चर्चेत असतात. (IAS Amit Kataria)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Saam Exit Poll : महायुती की महाविकास आघाडी? 'करवीर' कोणाला पावणार? पाहा एक्झिट पोल!

Maharashtra Exit Polls: चांदवडमध्ये पुन्हा कमळ फुलणार? राहुल आहेर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT