Smartphone users can now block spam calls using built-in Android features saam tv
बिझनेस

Spam Calls: स्पॅम कॉलच्या ट्रिंग ट्रिंगला वैतागलात? 'या' सोप्या ट्रिक्सनं दूर होईल कटकट

Block Spam and Telemarketing Calls: तुम्हालाही स्पॅम कॉल्सचा त्रास होत असेल, तर तुमच्यासाठी एका खास फीचरची माहिती घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही हे स्पॅम कॉल ब्लॉक करू शकता.

Bharat Jadhav

  • स्पॅम कॉल्स आणि टेलिमार्केटिंग कॉल्सचा त्रास सर्वत्र वाढला आहे.

  • बहुतेक अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये स्पॅम कॉल ब्लॉक करण्याचे फीचर उपलब्ध आहे.

  • "Caller ID & Spam Protection" फीचर सक्षम करून कॉल्स थांबवता येतात.

  • या सुविधेमुळे अनावश्यक व फसवे कॉल्सपासून मुक्ती मिळू शकते.

भारतातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. प्रत्येकाला दररोज स्पॅम किंवा टेलिमार्केटिंग कॉल्स येत असतात. स्पॅम कॉल्सला तुम्ही वैतागलात का? वारंवार येणाऱ्या स्पॅम कॉल्सचा त्रास होतोय? तर आम्ही तुमच्यासाठी एक खास फीचर घेऊन आलो आहोत ज्याद्वारे तुम्ही हे स्पॅम कॉल ब्लॉक करू शकता.

हे स्पॅम कॉल्स एकाच नंबरवरून येत नाहीत तर वेगवेगळ्या नंबरवरून येतात, ज्यामुळे स्पॅम कॉल ओळखणे कठीण होते. आता बहुतेक अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट स्पॅम कॉल ब्लॉकिंग फीचर असते. त्यामुळे या कॉल्सची कटकट बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकते. या सुविधेचा वापर करून तुम्ही स्पॅम कॉल्सपासून कसे मुक्त होऊ शकता ते जाणून घेऊया.

Samsung Galaxy युझर्ससाठी टीप्स

जर तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी फोन वापरत असाल तर स्पॅम कॉल्स टाळण्याचे काही सोपे मार्ग आहेत. प्रथम, फोन अॅप उघडा आणि वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन ठिपक्यांवर टॅप करा. नंतर ब्लॉक नंबर्सचा पर्याय निवडा आणि येथूनlock calls from unknown numbers चालू करा. तसेच ब्लॉक स्पॅम आणि स्कॅम कॉल्स देखील सक्रिय करायला विसरू नका. जर तुम्हाला एखादा विशिष्ट नंबर ब्लॉक करायचा असेल तर तो मॅन्युअली देखील ब्लॉक करू शकतात.

OnePlus, Oppo, Vivo, iQOO आणि Realme युझर्ससाठी

बहुतेक वनप्लस फोनमध्ये गुगल डायलर बिल्ट इन असते, त्यामुळे स्पॅम कॉल ब्लॉक करणे खूप सोपे आहे. फोन अॅप उघडा, नंतर तीन बिंदूंवर जा. त्यानंतर सेटिंग्जमध्ये कॉलर आयडी आणि स्पॅम वर टॅप करा. येथे स्पॅम कॉल फिल्टर चालू करा. Oppo, Vivo, iQOO आणि Realme सारख्या फोनमध्येही हीच पद्धत वापरा कारण त्यांच्याकडे गुगल डायलर आहे. फोन अॅप उघडा, सेटिंग्जमध्ये जा, कॉलर आयडी आणि स्पॅम निवडा आणि स्पॅम कॉल फिल्टर चालू करा.

Xiaomi आणि Poco फोनमध्ये स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्याची पद्धत

Xiaomi आणि Poco फोनमध्ये HyperOS किंवा MIUI इंटरफेससह इनबिल्ट डायलर आहे. तुम्ही फोन अॅप उघडा आणि तीन बिंदूंवर टॅप करा, सेटिंग्जमधील कॉलर आयडी आणि स्पॅम विभागात जा आणि स्पॅम कॉल फिल्टर करा चालू करा. या सेटिंग्ज असूनही स्पॅम कॉल येत राहिल्यास, तुम्ही सरकारी यंत्रणेची मदत देखील घेऊ शकता.

यासाठी DND म्हणजेच डू नॉट डिस्टर्ब सेवा सक्रिय करा. तुमच्या मोबाईलवरून START 0 टाइप करून १९०९ या क्रमांकावर एसएमएस पाठवा. याशिवाय, तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून TRAI DND अॅप डाउनलोड करू शकता. आणि तुम्ही तुमचा नंबर रजिस्टर करून कॉल ब्लॉकिंग पर्याय सक्रिय करू शकता.

स्पॅम कॉल म्हणजे काय?

टेलिमार्केटिंग किंवा फसवे कॉल्सला स्पॅम कॉल म्हणतात.

स्पॅम कॉल्सचा त्रास का होतो?

हे कॉल्स वारंवार वेगवेगळ्या नंबरवरून येतात, ज्यामुळे त्यांना ओळखणे कठीण होते.

स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्याचा सोपा मार्ग कोणता आहे?

बहुतेक अँड्रॉइड फोनमध्ये इनबिल्ट स्पॅम कॉल ब्लॉकिंग फीचर असते, ते सुरू करून तुम्ही कॉल्स थांबवू शकता.

हे फीचर कसे चालू करावे?

फोनच्या कॉल सेटिंग्जमध्ये जाऊन "Caller ID & Spam Protection" पर्याय निवडा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT