Tech News Saam tv
बिझनेस

Tech News: आयटी कंपन्यांचं भयान वास्तव! ५० लाख पगार अन् फक्त ३ टक्के पगारवाढ; कर्मचाऱ्यांची नाराजी

Technology News: सोशल मीडियावर सध्या एका महिला कर्मचाऱ्याची पोस्ट व्हायरल होत आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या वार्षिक पगारवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे.

Siddhi Hande

सध्या आयटी क्षेत्रातील वाढ खूप झपाट्याने होत आहे. कोट्यवधी कर्मचारी आयटी क्षेत्रात काम करतात.आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वार्षिक पगारवाढ होते. या कर्मचाऱ्यांना चांगला पगार असतो. नुकतीच एका टेक्निकल लीड असलेल्या महिलेने पोस्ट केली आहे. यामध्ये तिने वार्षिक पगारवाढ बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टेक्निकल लीड असलेल्या महिला कर्मचाऱ्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, अनेक वर्षांची निष्ठा आणि उत्तम कामगिरी करुनदेखील कर्मचाऱ्यांना फक्त ३ टक्के पगारवाढ मिळाली आहे. कर्मचाऱ्याने कंपनीबद्दलच्या लॉयल्टी टॅक्सबाबत आपलं मत मांडलं आहे.

जिथे खूप वर्ष काम करुनदेखील वेतनवाढीसाठी दुर्लक्ष केले जाते. कंपनी नेहमी म्हणते की, आम्ही तुमची काळजी घेऊ, मात्र, ही आश्वासने प्रत्यक्षात येतच नाही, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मी अनेक वर्ष कंपनीशी एकनिष्ठ राहिली, मात्र, फक्त ३ टक्के पगारवाढ मिळाली, हे नेमकं काय सुरु आहे, असं त्या कर्मचाऱ्याने म्हटलं आहे.

याबाबत महिला कर्मचाऱ्याने म्हटलंय की, मी एका प्रोडक्ट कंपनीत वरिष्ठ टेक्निकल लीड म्हणून काम करते. गेल्या अनेक वर्षात मला चांगल्या कामाच्या संधी मिळाल्या. मात्र, मी याच कंपनीत राहण्याचा निर्णय घेतला. माझा या कंपनीवर विश्वास होता. टीमसोबत काम करताना मला आरामदायी वाटते. इथे माझ्या कामाबद्दल मोबदला मिळेल, असं मला सांगण्यात येत आहे. मी आधीच्या तुलनेत जास्त पगारात आहे. मला आवाजवी अपेक्षा नाही. मला योग्य पगारवाढ मिळायला हवी होती मात्र, फक्त ३ टक्के पगारवाढ मिळाली. मी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला मात्र, यातून काहीच निष्पन्न झाले नाही. याबाबत कोणीही उत्तर दिले नाही. मला ESOPs देऊ करण्यात आली. पण ती खऱ्या अर्थाने भरपाई आहे, असं मला वाटलं नाही.

टेक कंपन्यांचं भयानक वास्तव समोर आलं आहे. कर्मचाऱ्यांना अपेक्षित पगारवाढ मिळत नाही. दरवर्षी फक्त २ ते ३ पगारवाढ मिळत असल्याने कर्मचाऱ्यांचे समाधान होत नाहीये. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कंपनीपप्रती असलेल्या निष्ठेचा काहीही अपयोग नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT