Tata Tiago And Tata Tigor Specification and Price Detail in Marathi Saam Tv
बिझनेस

Tata's New CNG Car: टाटाचा मोठा धमाका! देशातील पहिली ऑटोमॅटिक CNG कार लाँच; जाणून घ्या किंमत

Tata Tiago And Tata Tigor Specification in Marathi | टाटा कंपनीने नुकतीच भारतात पहिली ऑटोमॅटिक सीएनजी कार लाँच केली आहे. कंपनीने Tiago CNG AMT आणि Tigor CNG AMT कारला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससोबत लाँच केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tata Tiago And Tata Tigor AMT:

टाटा मोटर्स ही वाहन उत्पादनातील नावाजलेली कंपनी आहे. कंपनीने देशातील सर्वात पहिली ऑटोमॅटिक सीएनजी कार विक्रीसाठी लाँच केली आहे. ऑटोमॅटिक सीएनजी कार लाँच अजूनपर्यंत कोणत्याच कंपनीने केली नाहीये.

कंपनीने नुकतीच Tiago CNG AMT आणि Tigor CNG AMT कारला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससोबत लाँच केले आहे. या कारची किंमतदेखील स्वस्त आहे. (Latest News)

किंमत (Price)

नवीन ऑटोमटिक सीएनजी कारची सुरुवातीची किंमत ७.८९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. Tiago iCNG AMT च्या ऑटटोमॅटिक व्हेरियंटची किंमत ७,८९,९०० रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने या कार चार ट्रिममध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याच्या टॉप XZA NRG ट्रिमची किंमत ८,७९,९०० रुपये ठेवण्यात आली आहे. Tigor iCNG ऑटोमॅटिक फक्त दोन ट्रीममध्ये लाँच करण्यात आली आहे. कारच्या बेस व्हेरियंटची किंमत ८,८४,९०० रुपये तर टॉप व्हेरियंटची किंमत ९,५४,९०० रुपये ठेवण्यात आली आहे.

टाटा मोटर्सच्या या ऑटोमॅटिक सीएनजी कार २८.०६ किमी पर्यंत मायलेज देते. कंपनीने या कारमध्ये अनेक नवीन रंग सादर केले आहेत. त्यामुळे कारला एक आकर्षक लूक मिळाला आहे. ही कार आता बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे.

याबाबत कंपनीच्या मुख्य व्यावसायिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीएनजी कारला गेल्या काही वर्षात प्रचंड पसंती मिळवली आहे. टाटा मोटर्सने ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी आणून या क्षेत्रात क्रांती केली आहे.या कारमध्ये बूट स्पेस देण्यात आले आहे. आम्ही सर्वोत्तम सुविधा देत ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह टियागो आणि टिगोर कार लाँच केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

Maharashtra Live News Update: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती

अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी केक कापला; स्मशानभूमीतच वडिलांकडून लेकीचं वाढदिवस साजरा

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

SCROLL FOR NEXT