RBI Loan Update: लोन घेणाऱ्यांसाठी RBIचं मोठं गिफ्ट; प्रोसेसिंग फीसह इतर चार्जेस भरावे लागणार नाहीत

Update on RBI Monetary Policy: आरबीआयने नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचसोबत बँक आता लोनवर कोणत्याही प्रकराची प्रोसेसिंग फी, डॉक्युमेंटेंशन फी चार्ज केली जाणार नाहीये.
RBI Reserve Bank of India Monetary Policy:  Repo Rate Remain Same and Other Charges Including Processing Fees Will Not Be Cahrged By The RBI
RBI Reserve Bank of India Monetary Policy: Repo Rate Remain Same and Other Charges Including Processing Fees Will Not Be Cahrged By The RBISaam Tv
Published On

RBI Does Not Charge Processing Fee On Loan:

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. बँकेच्या या निर्णयामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये कोणतीही कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट हा ६.५ टक्केच राहणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना लोनवर जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत. (Latest News)

RBI Reserve Bank of India Monetary Policy:  Repo Rate Remain Same and Other Charges Including Processing Fees Will Not Be Cahrged By The RBI
RBI Repo Rate : सर्वसामान्यांना दिलासा नाहीच; रेपो रेट जैसे थे; Home Loan, Car Loan च्या EMI वर काय परिणाम होणार?

आरबीआयने नवीन कर्जासंबंधितदेखील एक निर्णय घेतला आहे. जे लोक आता नवीन कर्ज घेणार आहेत. त्यांना प्रोसेसिंग फी, डॉक्युमेंटेंशन फी किंवा इतर चार्जेस भरावे लागणार नाहीत. त्यामुळे त्यांना कर्ज घेताना कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही. ही रक्कम त्यांच्या कर्जाच्या व्याजात जोडली जाणार आहे. या निर्णयामुळे कर्जदारांना कर्ज घेताना कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही.

याबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माहिती दिली आहे. चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयची चलनविष्यक धोरण समितीची बैठक दर दोन महिन्यांनी होतो. गेल्या वर्षी रेपो रेट दरात वाढ करण्यात आली होती. रोपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ केली होती. त्यानंतर यावेळी रेपो रेट स्थिर असल्याचे सांगण्यात आला आहे.

रेपो रेटचा परिणाम खाजगी बँकावर होत असतो. त्यामुळे बँकेच्या कर्जाचा ईएमआय वाढतो. परंतु रेपो रेटमध्ये कोणताही बदल न झाल्याने ईएमआयच्या किंमतीत वाढ न होण्याचे सांगितले आहे.

RBI Reserve Bank of India Monetary Policy:  Repo Rate Remain Same and Other Charges Including Processing Fees Will Not Be Cahrged By The RBI
Petrol Diesel Rate (8th Feb 2024): कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या इंधनाचे नवे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com