RBI Repo Rate : EMI चं ओझ हलक होणार, RBI रेपो रेट कपात करण्याच्या तयारीत ? जाणून घ्या सविस्तर

RBI Repo Rates Cute : येत्या फेब्रुवारी २०२४ मध्ये व्याजदर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
RBI Repo Rate
RBI Repo Rate Saam Tv
Published On

Reserve Bank Of India : देशातील सर्व बँकांची बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आरबीआयने अलीकडे रेपो दरांत कोणतेही बदल केलेल नाहीत. त्यामुळे रिझर्व्ह बँक रेपो दरात कधी कपात करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर येत्या फेब्रुवारी २०२४ मध्ये व्याजदर (interest) कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये चलनविषयक आढाव्यापर्यंत रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याची प्रक्रिया असेल अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे.

RBI Repo Rate
Changes In Bank Locker Rules: बँकेचे लॉकर वापरताय? बदलले आहेत नियम, या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फेब्रुवारी २०२४ च्या आढावा बैठकीत रेपो दरात पहिली कपात होण्याची शक्यता आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख दीपक जसानी यांनीही याबाबत माहिती दिली आहे.

प्रसारमाध्यमांना माहीती देताना ते म्हणाले की, रेपो दरांमध्ये बदल सध्या करता येणार नाही त्यामुळे आरबीआयने त्याच्या दरात स्थिरता आणण्याचे ठरविले आहे. देशातील महागाई सध्या कमी होण्याच्या मार्गवार आहे त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी महागाई 4 टक्क्यांवर कायम राहाली अशी शक्यता आहे.

RBI Repo Rate
Education Loan : टेन्शन नॉट ! पैशांच्या अडचणींमुळे शिक्षण थांबले ? उच्च शिक्षणासाठी कसे मिळवाल लोन? जाणून घ्या सविस्तर

1. महागाई 4 टक्क्यांवर

एचडीएफसी बँकेचे (Bank) मुख्य अर्थतज्ज्ञ अभिक बरुआ यांनी म्हटले आहे की, आरबीआय गव्हर्नर या व्याजदारच्या बाबतीत अधिक उत्साही आहेत त्यामुळे महागाईच्या भविष्याबद्दल अधिक सावध असणे गरजेचे आहे. तसेच महागाई ही ४ टक्क्यांवर आहे असे देखील त्यांनी सांगितले आहे.

2. जाणून घ्या तज्ज्ञांचे मत काय आहे?

क्रिसिल रेटिंग्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ धर्मकीर्ती जोशी यांनी देखील सांगितले की आरबीआय चालू आर्थिक वर्षात दरांवर आहे तो रेपो दर ठेवतील. 2024 च्या मार्च तिमाहीतच कपात सुरू करेल. UBS इंडियाच्या अर्थशास्त्रज्ञ तन्वी गुप्ता जैन यांनी फेब्रुवारी 2024 च्या बैठकीत आरबीआयने दर कमी करावेत अशी अपेक्षा केली आहे. यापूर्वी त्यांनी डिसेंबर 2023 च्या रिव्ह्यूमध्ये असे होईल अशी अपेक्षा केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com