Changes In Bank Locker Rules: बँकेचे लॉकर वापरताय? बदलले आहेत नियम, या 5 गोष्टी लक्षात ठेवा

SBI New Rule : नुकतेच या नियमांमध्ये फेरबदल करण्यात आले असून तुम्हाला ते जाणून घेणे फायदेशीर ठरेल.
Changes In Bank Locker Rules
Changes In Bank Locker RulesSaam Tv

Bank Locker Rule : आपण जेव्हा एखाद्या बँकेमध्ये आपले खाते खोलतो तेव्हा आपल्याला बँकेकडून अनेक विविध प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. यामध्ये तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पासबूक, चेक बूक यांसारख्या सेवा पूरवल्या जातात.

याच बरोबर पुरवली जाणारी सुविधा म्हणजे आपल्याला आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी दिला जाणारा लॉकर. आपण अनेकदा आपले मौल्यवान दागिने (Gold), एखादी महत्त्वाचा कागदपत्रे यामध्ये ठेवतो. असे करण्यासाठी बँक तुम्हाला परवानगी देते पण त्यापूर्वी तुमच्याकडून काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही घेतली जाते. हा प्रत्येक बँकेचा सुरक्षित व्यवहाराचा नियम असतो. परंतु नुकतेच या नियमांमध्ये (Rule) फेरबदल करण्यात आले असून तुम्हाला ते जाणून घेणे फायदेशीर ठरेल.

Changes In Bank Locker Rules
Kotak Bank UPI Payment Message : कोटक बँकेचा ग्राहकांना मोठा धक्का! आता UPI Payment नंतर येणार नाही बँकेचा मॅसेज

जर, तुमचे बँकेचे खाते भारतीय स्टेट बँकेत आहे. तर तुम्हाला निश्चितच लॉकर सुविधेचा वापर करण्यासाठी 30 जून पर्यंत नव्या करारावर सही करण्याचा मेसेज मिळालाच असेल. असे असेल तर घाबरण्याची गरज नाही. खरेतर, भारतीय रिर्झव्ह बँकेने बँकेच्या लॉकर संबंधित नियमांमध्ये फेरबदल केले आहेत. याच संदर्भात बँकेकडून ग्राहकांना नव्या करारावर सही करण्यासाठी मेसेजद्वारे कळविण्यात आले आहे. जरी एसबीआयच्या मॅसेजमध्ये सही करण्याची शेवटची तारीख 30 जून सांगितली आहे. त्यासाठी काही गोष्टी (Things) लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

1. नव्या लॉकर नियमांसंबंधित या 5 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यकः

जर तुम्ही बँकेच्या लॉकर सेवेचा लाभ घेत असाल तर, तुम्हाला आरबीआयकडून लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे.

1. आरबीआयने बँकेच्या लॉकरच्या नवीन करारांवर सही करण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी 2023 ठेवली होती परंतु, आता ती बदलून 31 डिसेंबर 2023 करण्यात आली असून ही प्रक्रिया टप्प्याटप्प्यांने पूर्ण करायची आहे.

Changes In Bank Locker Rules
Aadhar Card Download : आधार कार्ड हरवले आहे ? १४ अंकी नंबरही लक्षात नाही ? कसे कराल डाउनलोड

2. आरबीआय बँक लॉकरचे 50 टक्के नवे करार 30 जूनपर्यंत, 75 टक्के करार 30 सप्टेंबर आणि 100 टक्के करार 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करायचा विचार केला आहे.

3. बँक लॉकरचे नवे नियम ग्राहकांसाठी 1 जानेवारी 2022 पासूनच लागू करण्यात आले होते. बँकेच्या जुन्या ग्राहकांसाठी नव्या करारावर सही करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

4. बँके बरोबरच लॉकर ठेवण्यासाठी नव्या करारावरील सही स्टँप पेपरवर करण्यात येणार आहे. तर जुन्या ग्राहकांना याकरीता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

5. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आरबीआयने करारात नवे बदल केले आहेत.

1. काय आहेत नव्या नियमांतील फेरबदल?

सुप्रिम कोर्टाकडून फेब्रुवारी 2021 मध्ये निघालेल्या एका आदेशानुसार केंद्रीय बँकेकडून लॉकर संबंधित नियमांत फेरबदल केले आहेत.

1. नव्या बँक लॉकरच्या नियमांनुसार, बँक आणि ग्राहकांना नव्या करारात कोणत्या प्रकारचे सामान लॉकर मध्ये ठेवले जाऊ शकते आणि कोणते नाही याबद्दल स्पष्ट करण्यात आले आहे.

Changes In Bank Locker Rules
Aadhar-Bank Account Link : तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ? आता घरबसल्या कळेल, फॉलो करा स्टेप

2. नव्या नियमांनुसार आता ग्राहक फक्त दागिने, महत्त्वाची कागदपत्रे आणि कायदेशीररित्या मान्य असलेल्या गोष्टीच ठेऊ शकतात.

3. बँकेचे लॉकर आता वैयक्तिक होणार असून, नॉन ट्रांसफरेबल करण्यात येणार आहेत. म्हणजेच आता कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आपले लॉकर वापरू शकत नाही.

4. बँकेच्या लॉकरमध्ये शस्त्रे, रोख रक्कम किंवा परकीय चलान, औषधे, निषिध्द किंवा विषारी वस्तू ठेवता येणार नाही.

Changes In Bank Locker Rules
Girija Prabhu : साज ह्यो तुझा..., गिरजाचं हास्य पाहून चाहत्यांचा जीव भुलला !

5. नवे नियम बँकेला अनेक जबाबदाऱ्यांतून मुक्त करणारे आहेत. जर तुमच्या बँकेच्या लॉकरची किल्ली हरवली आणि तिचा दुरूपयोग झाला तर बँक याची जबाबदारी घेणार नाही.

6. ग्राहकांच्या सामानाच्या सुरक्षेची जबाबदारी बँकेची असते आणि बँक असे करण्यास असमर्थ ठरल्यास बँकेला (Bank) याची भरपायी द्यावी लागू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com