Aadhar Card Download : आधार कार्ड हरवले आहे ? १४ अंकी नंबरही लक्षात नाही ? कसे कराल डाउनलोड

How To Download Aadhar card Online : हल्ली आधार कार्ड हे सगळ्या महत्त्वाच्या कागदपत्रांना जोडले गेले आहे.
Aadhar Card Download
Aadhar Card DownloadSaam Tv

Aadhar Card Online : अनेकदा असे होते की, प्रवास करताना किंवा आपल्या विसरभोळेपणामुळे आपल्याकडून महत्त्वाची कागदपत्रे हरवतात. त्यात जर आधार कार्ड असेल तर आपल्याला टेन्शन येते. हल्ली आधार कार्ड हे सगळ्या महत्त्वाच्या कागदपत्रांना जोडले गेले आहे त्यामुळे ते हरवले की, आपल्या पुढच्या गोष्टींचा घोळ होतो.

पण आता चिंता करण्याची गरज नाही. तुमचे आधारकार्ड (Aadhar card) हरवले असेल व १४ अंकी नंबरही लक्षात नसेल तरी आपण डिजिटल रुपात डाउनलोड करु शकतो. UIDAI ने अशी सुविधा दिली आहे की तुम्ही आधार क्रमांक (Number) न टाकता आधार कार्ड ऑनलाइन (Online) डाउनलोड करू शकता. कसे ते जाणून घेऊया.

Aadhar Card Download
Aadhar-Bank Account Link : तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ? आता घरबसल्या कळेल, फॉलो करा स्टेप

1. या स्टेप फॉलो करा

  • तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जावे लागेल.

  • यानंतर, होमपेजवर, तुम्हाला My Aadhaar टॅबखाली EID/Aadhaar नंबर Retrieve या पर्यायावर जावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला एका नवीन टप्प्यावर रीडायरेक्ट केले जाईल जिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा EID निवडावा लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, पिन कोड आणि कॅप्चा टाकावा लागेल.

  • Get One Time Password (OTP) बटणावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल.

Aadhar Card Download
WhatsApp Chat Lock Feature: व्हॉट्सअ‍ॅपच नव अपडेट ! आता चॅट ही करता येणार लॉक, कसे कराल? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप

2. OTP टाका आणि सबमिट करा.

  • यानंतर तुमचा आधार क्रमांक तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला जाईल.

  • यानंतर तुम्हाला पुन्हा My Aadhaar टॅबवर जावे लागेल. त्यानंतर डाउनलोड आधार पर्यायावर जावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल. त्यानंतर एक OTP येईल. ते टाकावे लागेल

  • यानंतर तुमचे आधार कार्ड पीडीएफ फाइल म्हणून डाउनलोड होईल.

  • आता आधार कार्ड उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या नावाची चार कॅपिटल अक्षरे आणि जन्माचे वर्ष एकत्र लिहावे लागेल आणि तुमचे आधार कार्ड ओपन होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com