Tata Punch Ev Scores 5-Star Rating Saam TV
बिझनेस

Tata Punch EV ला क्रॅश टेस्टमध्ये मिळाली 5-स्टार सेफ्टी रेटिंग, फॅमिलीसाठी बेस्ट आहे ही कार; जाणून घ्या Price

Tata Punch EV Scores In Bharat Ncap Crash Test: टाटा पंच इलेक्ट्रिकने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आहे. भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये याला 5-स्टार रेटिंग मिळाली आहे.

Satish Kengar

कार बाजार हे सातत्याने बदलत आहे. आजकाल कारच्या सुरक्षेबाबत कंपन्या बरंच काम करत आहेत. ग्राहकही अशी कार घेण्याचा विचार करतात जी संपूर्ण सुरक्षित असेल. यात देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सच्या पंच ईव्हीला मोठं यश मिळालं आहे.

भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये याला 5-स्टार रेटिंग मिळावी आहे. याची किंमत 10.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. B-NCAP च्या क्रॅश टेस्टनुसार Punch EV ही देशातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे.

या कारला प्रौढ सुरक्षिततेमध्ये 32 पैकी 31.46 गुण, मुलांच्या सुरक्षिततेमध्ये 49 पैकी 45 गुण, फ्रंटल ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये 16 पैकी 15.71 गुण आणि साइड मूव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये 16 पैकी 15.74 गुण मिळाले आहेत.

Tata Punch EV फीचर्स

पंच EV ची बॉडी खूप मजबूत आहे. सुरक्षेसाठी यात 6 एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS + EBD) आणि ESC, तीन-पॉइंट सीट बेल्ट, ISOFIX माउंट सारखे स्टँडर्ड फीचर्स आहेत. याशिवाय यात 7.0-इंच टचस्क्रीन आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण सारखे फीचर्सही यात ग्राहकांना मिळतात.

बॅटरी आणि रेंज

टाटा पंच EV मध्ये 25 kWh आणि 35 kWh बॅटरी पर्याय आहेत. ही कार एका चार्जमध्ये 315 किलोमीटर आणि 421 किलोमीटरपर्यंतची रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे. पंच इलेक्ट्रिकची किंमत 10.99 लाख ते 15.49 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार जलद चार्जिंगला सपोर्ट करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

SCROLL FOR NEXT