टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी भारतातील सर्वाधिक पसंतीची व्हॅन 'टाटा मॅजिक'च्या ४ लाख आनंदी ग्राहकांच्या उल्लेखनीय टप्पा साजरा करत आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी कंपनीने ग्राहकांच्या सोयीसुविधेमध्ये अधिक वाढ करण्यासाठी नवीन व्हेरिएण्ट 'मॅजिक बाय-फ्यूएल' लाँच केले आहे.
लास्ट-माइल परिवहनामध्ये विश्वसनीयता, कार्यक्षमता व किफायतशीरपणासाठी ओळखली जाणारी १०-आसनी टाटा (tata) मॅजिक प्रवाशांची, तसेच ऑपरेटर्सची पसंतीची राहिली आहे. टाटा मॅजिकची आकर्षक डिझाइन, सुरक्षितता व प्रवाशांना आरामदायी सुविधा अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण यशासाठी महत्त्वाची राहिली आहेत.
टाटा मॅजिकमध्ये इको स्विच, गिअरशिफ्ट अडवायजर आणि सुधारित ड्रायव्हर एर्गोनॉमिक्स अशी अनेक मूल्यवर्धित वैशिष्ट्ये आहेत, ज्यांचा मालकीहक्काचा एकूण खर्च कमी करण्याचा मनसुबा आहे. मॅजिक विद्यार्थी व कर्मचारी परिवहन आणि लास्ट-माइल गतीशीलतेसाठी परिपूर्ण आहे. मॅजिक बाय-फ्यूएलमध्ये ६९४ सीसी इंजिनची शक्ती आहे आणि या व्हेरिएण्टमध्ये ६० लिटर सीएनजी टँकसह ५ लिटर पेट्रोल टँक आहे, ज्यामुळे वेईकल संपूर्ण इंधन भरले असताना जवळपास ३८० किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास (Travel) करू शकते. अद्वितीय कार्यक्षमता व कमी देखभाल खर्च देणारी मॅजिक २ वर्षे किंवा ७२,००० किमीच्या अपवादात्मक वॉरंटीसह येते.
या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्सच्या पॅसेंजर बिझनेसचे उपाध्यक्ष व प्रमुख श्री. आनंद एस. म्हणाले, “आम्हाला वैविध्यपूर्ण मॅजिक ब्रँडसाठी ४ लाख आनंदी ग्राहकांचा टप्पा संपादित करण्याचा आनंद होत आहे. विश्वास, कार्यक्षमता व आरामदायीपणाच्या ४ लाख प्रवासांना साजरे करत मॅजिक भारतातील वाहतूकीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या टप्प्याला साजरे करण्यासाठी आम्हाला फर्स्ट-इन-इट्स-सेगमेंट मॅजिक बाय-फ्यूएल लाँच करण्याचा आनंद होत आहे, जेथे या नवीन व्हेरिएण्टमध्ये सीएनजीच्या फायद्यांसह पेट्रोलची विस्तारित रेंज समाविष्ट आहे.
नवीन व्हेरिएण्ट विकसित होत असलेल्या परिवहन गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि ग्राहकांकरिता लाभक्षमता व सोयीसुविधेमध्ये सुधारणा करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. आम्ही ग्राहकांचे त्यांनी दिलेला पाठिंबा व लॉयल्टीसाठी आभार व्यक्त करतो. आम्ही उच्च दर्जाचे गतीशीलता सोल्यूशन्स प्रदान करत राहण्याप्रती कटिबद्ध आहोत.''
सर्वसमावेशक गतीशीलता सोल्यूशन्स प्रदाता टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांमध्ये प्रगत वैशिष्ट्ये, कार्यक्षम पॉवरट्रेन्स आणि इतर मूल्यवर्धित वैशिष्ट्ये आहेत. ताफा मालकांना सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता, कमी कार्यसंचालन खर्च, उच्च वेईकल अपटाइम, रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि टाटा मोटर्स फ्लीट एजच्या माध्यमातून अॅनालिटिक्स यामधून फायदा मिळतो.
त्यांचा संपूर्ण सेवा २.० उपक्रम अद्वितीय वेईकल लाइफसायकल व्यवस्थापन सेवांसह ताफा व्यवस्थापन सोल्यूशन्स, वार्षिक देखभाल कंत्राट आणि रोडसाइड असिस्टण्स देतो. २५०० हून अधिक टचपॉइण्ट्सचे व्यापक सेवा नेटवर्क, प्रशिक्षित स्पेशालिस्ट्सकडून नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी आणि टाटा जेन्यूएन पार्ट्सचे पाठबळ असलेली टाटा मोटर्स अद्वितीय दर्जा व सेवा कटिबद्धतेची खात्री देते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.