टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीला सानंद, गुजरात येथील त्यांच्या अत्याधुनिक प्लांटमधून १0 लाख कार उत्पादनाचा टप्पा गाठला आहे. या उल्लेखनीय यशामधून टाटा मोटर्सची उच्च दर्जाची उत्पादने वितरित करण्यासाठी सतत नाविन्यता आणण्याप्रती कटिबद्धता दिसून येते. ही उत्पादने ग्राहकांना अधिक आनंद देतात. तसेच यामधून सानंद प्लांटमधील टीमची अथक मेहनत आणि समर्पितता दिसून येते, ज्यांनी हा टप्पा गाठण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
२०१० मध्ये ११०० एकर जागेवर सानंद प्लांटची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये ७४१ एकर जागेवर टीएमएल आणि ३५९ एकर जागेवर वेंडर पार्क आहे, तसेच ६००० हून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर्मचारी आहेत. हे प्लांट टाटा मोटर्सच्या विकास व यशामध्ये साह्यभूत राहिले आहे. टाटा मोटर्सचे सर्वात नवीन प्लांट असलेल्या सानंद प्लांटमध्ये असलेल्या सर्व प्रक्रियांमध्ये अप-टू-द-मिनट तंत्रज्ञान आहे. या उच्च मेकॅनाइज्ड प्लांटमध्ये सर्वोत्तम प्रक्रिया व्यवस्थापन सिस्टम आहे. तसेच, प्लांटमध्ये प्रेस लाइन, विल्ड शॉप, पेंट शॉप, असेम्ब्ली लाइन आणि पॉवरट्रेन शॉप आहे. या प्लांटमध्ये स्थिर असेम्ब्ली लाइन आहे आणि प्रवासी वाहनांचे विविध मॉडेल्स उत्पादित करण्यासाठी ओळखले जाते जसे टियागो, टियागो एएमटी, टियागो.ईव्ही, टियागो आयसीएनजी, टिगोर, टिगोर एएमटी, टिगोर ईव्ही, टिगोर आयसीएनजी आणि एक्स्प्रेस-टी ईव्ही. सिंगल मॉडेल प्लांट यशस्वीरित्या मल्टी-मॉडेल प्लांटमध्ये बदलण्यात आले असून १०० टक्के मालमत्ता व्यवस्थापन व वापरासह तीन मॉडेल्सची निर्मिती करते.
या संस्मरणीय प्रसंगी मत व्यक्त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा म्हणाले, ''आम्हाला आमच्या सानंद प्लांटमधून १ दशलक्षवी कार प्रस्तुत करण्याचा अत्यंत अभिमान वाटत आहे. हे प्लांट बाजारपेठेतील गरजांना प्रतिसाद देत भारतातील आमच्या विकासगाथेला चालना देण्यामध्ये महत्त्वाचे राहिले आहे. या यशामधून आम्ही आमच्यासाठी स्थापित केलेले उच्च मानक आणि ग्राहकांप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्ही आमच्या उत्पादनांसाठी अथक मेहनत घेतली आहे आणि या टप्प्यामधून निश्चितच ग्राहकांमधील आमच्या उत्पादनांची लोकप्रियता अधिक दृढ होते. आम्हाला सुरक्षित, स्मार्टर व हरित गतीशीलता सोल्यूशन्स प्रदान करण्याची गती सुरू राहण्याचा विश्वास आहे. आम्ही या सुवर्ण टप्प्याचे श्रेय आमचे कर्मचारी, पुरवठादार, चॅनेल भागीदार यांना देण्यासह त्यांचे आभार व्यक्त करतो, तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुजरात सरकारचे त्यांच्या अविरत पाठिंब्यासाठी आभार व्यक्त करतो, जे हा टप्पा गाठण्यासाठी महत्त्वाचे राहिले आहेत.''
टाटा मोटर्सचा व्यक्ती व समुदायांच्या सामाजिक उन्नतीवर नेहमी विश्वास आहे. सानंद प्लांटने सानंद, बावला आणि विरागाममधील व आसपासच्या भागांमधील ६८ हून अधिक गावांना दत्तक घेतले आहे. शौचालयांची उभारणी, महिलांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी त्यांचा कौशल्य विकास आणि मुलींचे आरोग्य व शिक्षण हे प्रमुख उपक्रम आहेत, जे प्लांटने सानंदमध्ये त्यांचे सीएसआर उपक्रम म्हणून सुरू केले. गेल्या १३ वर्षांमध्ये टाटा मोटर्सच्या सीएसआर उपक्रमांनी सानंदमधील व आसपासच्या भागांमधील ३ लाखांहून अधिक व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.