Tata Curvv Saam Tv
बिझनेस

Tata Curvv: टाटाची नवीन गाडी आली; कॉमन मॅनला परवडणार; फीचर्स आणि लूक एकदम धमाल

Tata Mid Suv Curvv Launch: टाटा कंपनीने आपली नवीन मिड एसयूव्ही कर्व्ह भारतीय बाजारात लाँच केली आहे. ही एसयूव्ही उत्तम फिचर्ससह लाँच झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक कंपनीने आज एसयूव्‍ही कूपे 'टाटा कर्व्‍ह'च्‍या लाँचची घोषणा केली. या एसयूव्हीची किंमत 9.99 लाख रूपये आहे. कंपनीसाठी मोठा टप्‍पा गाठत आणि नाविन्‍यपूर्ण व वैविध्‍यपूर्ण बॉडी स्‍टाइल्‍समधील आयसीई पर्यायांसह झपाट्याने विकसित होत असलेल्‍या मिड-एसयूव्‍ही सेगमेंटमध्‍ये प्रवेश करत टाटा मोटर्सने तीन इंजिन पर्यायांमध्‍ये कर्व्‍ह लाँच केली आहे.

कारमध्ये तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. शक्तिशाली नवीन हायपेरियन गॅसोलाइन डायरेक्‍ट इंजेक्‍शन इंजिन, १.२ लीटर रेव्‍होट्रॉन पेट्रोल इंजिन आणि नवीन १.५ लिटर डिझेल इंजिनसह डिझेलमधील सेगमेंट फर्स्‍ट ड्युअल क्‍लच ट्रान्‍समिशन दिले आहे. त्यामुळे या एसयूव्ही ग्राहकांच्या पसंतीस आल्या आहेत.

बॉक्‍सी-एसयूव्‍ही बॉडी स्‍टाइल्‍ससह लोकप्रिय उच्‍च विकसित विभागामध्‍ये टाटा मोटर्सने आपल्‍या डीएनएशी बांधील राहत, तसेच महत्त्वाकांक्षीपणासाठी जागतिक स्‍तरावर मोठ्या प्रमाणात मान्‍यताकृत असलेली बॉडी स्‍टाइल प्रीमियम एसयूव्‍ही कूपे डिझाइनचे लोकशाहीकरण करत श्रेणीमध्‍ये धुमाकूळ निर्माण केला आहे.

कर्व्‍ह ही दर्जात्‍मक सुरक्षितता, सेगमेंट फर्स्‍ट वैशिष्‍ट्ये व पॉवरट्रेन पर्याय असलेली सेगमेंटमधील अद्वितीय वेईकल आहे. गोल्‍ड एसेन्‍स, डेटोना ग्रे, प्रिस्टिन व्‍हाइट, फ्लेम रेड, प्‍युअर ग्रे आणि ऑपेरा ब्‍ल्‍यू या सहा आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध टाटा कर्व्‍ह अकॉम्‍प्‍लीश, क्रिएटिव्‍ह, प्‍युअर व स्‍मार्ट परसोनांमध्‍ये ऑफर करण्‍यात येईल.

टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा म्‍हणाले, ''टाटा कर्व्‍हचे लाँच ऑटोमोटिव्‍ह सर्वोत्तमतेच्‍या दिशेने मोठे पाऊल आहे, ज्‍यामुळे भारतात नवीन एसयूव्‍ही कूपे बॉडी स्‍टाइल सादर झाली आहे, जी आतापर्यंत फक्‍त जागतिक स्‍तरावर मान्‍यताकृत राहिली आहे आणि फक्‍त प्रीमियम श्रेणींमध्‍ये उपलब्‍ध आहे. कर्व्‍ह सध्‍या मिड-एसयूव्‍ही सेगमेंटमधील सर्वात ऑफरिंग आहे आणि डिझाइन व तंत्रज्ञानामधील सर्वात चांगली एसयूव्ही आहे.

नुकतेच लाँच करण्‍यात आलेल्‍या Curvv.ev ला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. तिची डिझाइन व स्‍टाइल, तसेच उच्‍चस्‍तरीय वैशिष्‍ट्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कर्व एसयूव्ही विविध पॉवरट्रेन्‍स, विविध फर्स्‍ट इन सेगमेंट वैशिष्‍ट्ये, नवीन क्षमतापूर्ण आर्किटेक्‍चर - अॅटलास आणि लेव्‍हल २ एडीएएससह सर्वसमावेशक मिड-एसयूव्‍ही उत्‍पादन म्‍हणून आमचा एसयूव्‍ही पोर्टफोलिओ अधिक चांगला करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT