Foxconn Saam Tv
बिझनेस

Foxconn HCL Deal: खुशखबर! तैवानची 'नामांकित कंपनी' भारतात करणार 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक

Foxconn Investment In India: भारतीय अर्थव्यवस्था वृद्धींगत होत आहे. त्यामुळे परदेशी कंपन्यांची भारतात गुंतवणूक देखील वाढत असल्याचं दिसत आहे. तैवानच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉनने भारतात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Foxconn Invest 1200 Crore In India

भारतात अनेक देशांमधील मोठमोठ्या कंपन्या गुंतवणूक (Investment In India) करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था वृद्धींगत होत असल्यामुळं गुंतवणूक देखील वाढली आहे. तैवानच्या (Taiwan) फॉक्सकॉन कंपनीने भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या. (share market latest news)

फॉक्सकॉन कंपनीने भारतीय कंपनी एचसीएल (HCL) समूहासोबत करार केलाय. एचसीएल समूहासोबत भागीदारीत करत भारतात चिप असेंब्ली आणि टेस्टिंग प्लांट तयार करणार आहे. फॉक्सकॉन कंपनीनं या प्रकल्पासाठी सुरूवातीला 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतात पाय रोवण्याचा प्रयत्न

फॉक्सकॉन (Foxconn) हे नाव भारतासाठी नवीन नाही. ही तैवानची सर्वात मोठी कंपनी आहे. ॲपलची सर्वात मोठी उत्पादक म्हणून फॉक्सकॉन कंपनी ओळखली जाते. फॉक्सकॉन भारतात अधिक मजबूतपणे आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत (Foxconn Investment In India) आहे. यासाठी फॉक्सकॉनने भारतात सेमीकंडक्टर व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी आधी कंपनीने वेदांतसोबत भागीदारी केली होती. पण, नंतर फॉक्सकॉनला वेदांत ग्रुप सोडावा लागलं.

तैवानच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रमुख फॉक्सकॉनने नियामक फाइलिंगनुसार, एचसीएल समूहासोबत भागीदारीत भारतात चिप असेंब्ली आणि टेस्टिंग प्लांट तयार करण्यासाठी सुरूवात केली आहे. कंपनीने या प्रकल्पासाठी प्रारंभिक गुंतवणूक म्हणून 1,200 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. फॉक्सकॉनने स्वतःच्या जमिनीवर प्लांट उभारणार आहे. त्यासाठी त्यांनी आधीच जमीन खरेदी केली आहे.

एचसीएल समूहासोबत फॉक्सकॉनची भागीदारी

महिन्याच्या सुरुवातीला फॉक्सकॉन भारताच्या एचसीएल समूहासोबत देशात चिप पॅकेजिंग आणि चाचणी उपक्रम सुरू करण्यासाठी भागीदारी करत असल्याची बातमी आली होती. कंपनीने सांगितलं की, फॉक्सकॉनचे युनिट Hon High Technology India Mega Development Joint Venture मध्ये 40 टक्के हिस्सेदारीसाठी 37.2 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

फॉक्सकॉन आयफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सची जगातील सर्वात मोठी असेंबलर आहे. भू-राजकीय तणावामुळे ही कंपनी भारतात विस्तारत आहे. तसेच चीनमध्ये सतत वाढत असलेल्या आर्थिक अनिश्चिततेमुळे त्यांना काम करणं खूप कठीण झाले आहे. फॉक्सकॉन ही भारतातील सर्वात मोठी iPhones निर्माता कंपनी आहे. त्यांचा एकूण उत्पादनात 68 टक्के वाटा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT