Vedanta Foxcon: फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत फडणवीसांकडून महाराष्ट्राची दिशाभूल, आदित्य ठाकरेंचा आरोप

देवेंद्र फडणवीसांना जी माहिती दिली गेली ती चुकीची होती. फॉक्सकॉन कंपनी एक असली तरी वेदांता फॉक्सकॉन हा वेगळा प्रकल्प होता.
Aditya Thackeray Vs Devendra Fadnavis
Aditya Thackeray Vs Devendra Fadnavis Saam TV

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले यांचं खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडलं. फॉक्सकॉन आमच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेला नाही, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याबाहेर गेल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी या आरोपांना उत्तर दिलं. फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प वेगवेगळे आहेत. देवेंद्र फडणवीस दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचं त्यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीसांना जी माहिती दिली गेली ती चुकीची होती. फॉक्सकॉन कंपनी एक असली तरी वेदांता फॉक्सकॉन हा वेगळा प्रकल्प होता. देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केलेला प्रकल्प जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्रातून बाहेर गेला आहे. (Latest News Update)

हा प्रकल्पाबाबत 2016 साली देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ योजनेतून महाराष्ट्रात आला होता. ही फॉक्सकॉनची कंपनी असून महाराष्ट्रात मोबाइल निर्मिती करणार होती. राज्यातून आता बाहेर गेलेला प्रकल्प हा सेमिकंडक्टरचा आहे.

Aditya Thackeray Vs Devendra Fadnavis
Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक

मोठे प्रकल्प बाहेर जातायेत यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. स्क्रिप्ट वाचून उत्तर दिलं असतं तरी चाललं असतं. मात्र सध्याच्या सरकारमध्ये पॉवर कुणाकडे आहे हे आज कळालं, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

Aditya Thackeray Vs Devendra Fadnavis
Thackeray vs Shinde : सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार सुनावणी

त्या अधिकाऱ्याचं नाव जाहीर करा

आपल्या पत्रकार परिषेदत फडणवीस यांनी टाटा एअरबस प्रकल्पाबाबत बोलताना म्हटलं की, राज्यातील वातावरण प्रकल्पासाठी पोषक नसल्याचं अधिकाऱ्यांने म्हटलं होत. या आरोपांना उत्तर देतांना आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना थेट आव्हान दिलं. त्यांनी टाटा कंपनीच्या त्या अधिकाऱ्यांचं नाव जाहीर करावं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं म्हटल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com