रुपाली बडवे
Aaditya Thackeray News : वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प, बल्क ड्रग पार्क प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्यातील विरोधीपक्षातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार आहे, असा दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 'मेडिसीन डिवाइस पार्क' प्रकल्प राज्याबाहेर जाणार आहे, असा दावा करत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत 'मेडिसीन डिवाइस पार्क' हा प्रकल्प राज्याबाहेर जाणार असल्याचा दावा केला आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसेना (Shivsena) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचे ट्विट हे रिट्विट करत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी डिसीन डिवाइस पार्क' प्रकल्पासाठी केंद्र सरकारशी केलेले पत्र व्यवहार हे ट्विट केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्या पत्र व्यवाहाराचा हवाला देत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे ट्विट करत म्हणाले की, वेदांत-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क योजनेला देखील मुकावे लागले आहे'.
'उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.