Swiggy UPI Saam Tv
बिझनेस

Swiggy Service: स्विगीवरून फूड ऑर्डर करणं होणार अधिक सोपं, लॉन्च केली UPI सर्व्हिस; कसा करायचा वापर?

Swiggy Delivery App: देशात स्विगीला चांगली पसंती मिळते. आता याच्या मदतीने फूड ऑर्डर करने आणखी सोपं झालं आहे. कारण या कंपनीने स्वत:चे युपीआय सर्विस लॉन्च केले आहे.

Priya More

लोकप्रिय ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीचा वापर भारतामध्ये कोट्यवधी लोकं करतात. जर तुम्हाला खायला काही पदार्थांचे पार्सल मागवायचे असेल तर तुम्हाला अवघ्या काही मिनिटांमध्ये ते मिळते. त्यामुळे देशात स्विगीला चांगली पसंती मिळते. आता याच्या मदतीने फूड ऑर्डर करने आणखी सोपं झालं आहे. कारण या कंपनीने स्वत:चे युपीआय सर्विस लॉन्च केले आहे. असा दावा केला जात आहे की, या युपीआय सर्विसच्याद्वारे ग्राहकांना अधिक चांगला पेमेंट अनुभव मिळेल. NPCI च्या युपीआय प्लग-इन अॅपमध्ये एकत्रित केल्यामुळे पेमेंट पूर्वीपेक्षा अधिक वेगाने केले जाईल.

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने सांगितले की, युजर्स स्विगी अॅप न सोडता यूपीआयने व्यवहार करू शकतात. ज्यामुळे पेमेंट प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. ज्याठिकाणी पूर्वी युजर्संना पाच स्टेपचे पालन करावे लागत होते. आता ते त्यांच्या ऑर्डरसाठी फक्त एका स्टेपमध्ये पैसे देऊ शकणार आहेत. नवीन सेवा Juspay च्या Hyper UPI Pluggin च्या मदतीने काम करेल.

स्विगीच्या मदतीने ऑर्डर करताना युजर्संना सध्या पेमेंट अॅप्सवर जाऊन पेमेंट अप्रूव करावे लागते आणि ही प्रक्रिया अनेकांसाठी सोपी नसते. बऱ्याच वेळा युजर्संना थर्ड पार्टी यूपीआय अॅपवर रिडायरेक्ट झाल्यानंतर बऱ्याचदा युजर्सला पेमेंटमध्ये उशीर होत होता किंवा पेमेंट फेल होण्याच्या तक्रारीचा सामना करावा लागत होता. नवीन बदलामुळे आता युजर्सला या समस्येचा सामना करावा लागणार नाही.

प्लॅटफॉर्मने असा दावा केला आहे की, नव्या पेमेंट सेवासोबत युजर्ससाठी ट्रान्जॅक्शनचा वेळ तीन पटीने कमी झाला आहे आणि जिथे आधी पेमेंटमध्ये १५ सेकंदापर्यंतचा वेळ लागत होता. आता फक्त ५ सेकंदामध्ये पेमेंट केले जाऊ शकते. जर तुम्ही स्विगीच्या मदतीने ऑर्डर करत असाल तर तुम्ही अॅपच्या पेमेंट पेजवर स्विगी यूपीआय पर्याय निवडू शकता. प्रथमच त्याच्या मदतीने पेमेंट करण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक अकाऊंट या यूपीआय सेवेशी लिंक करावे लागेल. त्यानंतर प्रत्येक वेळी तुम्हाला पेमेंटसाठी यूपीआय पिन टाकावा लागेल आणि पेमेंट इतर कोणत्याही पेमेंट अॅपवर न जाता सहजपणे करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

SCROLL FOR NEXT