Government Schemes For Girls Saam Tv
बिझनेस

Sukanya Samriddhi Yojana: तुमच्या मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात किती पेसै आहेत? असं तपासा

Government Scheme : मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येतात. त्यातील एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेतील मुलींच्या खात्यात किती पैसे जमा आहेत, ते चेक करण्यासाठी ही प्रोसेस फॉलो करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sukanya Samriddhi Yojana Account Balance:

मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येतात. त्यातील एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी ही योदना आहे. या योजनेतून मुलींच्या शिक्षणाला चालना मिळते. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर त्यात किती पैसे जमा झाले आहे. हे अनेकांना माहित नसते. मात्र, तुम्ही या योजनेतील खात्यात किती पैसे जमा झाले आहे हे पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला एक सोपी प्रोसेस करायची आहे. (Latest News)

सुकन्या समृद्धी योजनेत तुमचे किती पैसे जमा आहेत हे पाहण्यासाठी योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.

वेबसाइटवर प्रवेश केल्यानंतर तुम्हाला तुमच्या योजनेच्या खात्यात लॉग इन करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड टाकावा लागेल.

यानंतर तुमचे खाते निवडावे लागेल. या खात्यात आल्यावर तुम्ही तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती मिळवू शकता.

यात तुम्हाला किती पैसे जमा झाले आहेत. पैसे जमा झाल्याची शेवटची तारीख कोणती याबाबत सर्व माहिती मिळेल.

सुकन्या समृद्ध योजनेद्वारे मुलींच्या भविष्याची आर्थिकदृष्टीने सुरक्षा होते. तिला भविष्यात शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या मदत होते.

सुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या नावावर खाते उघडायचे असते. त्यात तुम्ही पैसे गुंतवणूक करु शकता. यावर सरकार तुम्हाला ८ टक्के व्याजदर देते. ही रक्कम तुम्हाला १५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे. या योजनेत टॅक्सचे अनेक फायदे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

थायलंडच्या हल्ल्यानं कंबोडियाचा संताप,राष्ट्रपती म्हणतात एका कॉलवर युद्ध थांबवणार

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Weight loss diabetes medicine: वजन कमी करणारं औषध आलं, डायबेटीसही कंट्रोलमध्ये राहणार, भारतात किंमत किती?

Bride Useful Things: नव्या नवरीच्या कपाटात असायला हव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी

Andheri-Bandra: अंधेरी ते वांद्रे १५ डब्ब्यांची लोकल धावणार; कधीपासून होणार सुरु?

SCROLL FOR NEXT