OnePlus 12: वायर न लावता चार्ज होईल OnePlus 12; आज बाजारात होणार लॉन्च, काय असेल किंमत जाणून घ्या

OnePlus 12 : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही OnePlus 12 चा विचार करू शकतात. मोबाईल लॉन्च होण्यापूर्वीच कंपनीने OnePlus 12 च्या फीचर्सची माहिती दिली आहे. कंपनीने या फोनला Snapdragon 8 Gen ३ चिपसेट दिलीय. विशेष म्हणजे या मोबाईलला चार्ज करण्यासाठी कोणत्याच प्रकारची वायर लावण्याची किंवा कॉड जोडण्याची गरज नाहीय.
 OnePlus 12
OnePlus 12 OnePlus
Published On

OnePlus 12, OnePlus 12R price in India :

मोबाईल फोन निर्माती कंपनी वनप्लस आज नवीन एक मोबाईल लॉन्च करणार आहे. कंपनी OnePlus 12 आणि OnePlus 12R ला लॉन्च करणार आहे. तसेच भारतीय ग्राहकांच्या पसंतीस पडतील असे OnePlus Buds 3 देखील आज लॉन्च केले जाणार आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही OnePlus 12 चा विचार करू शकतात.(Latest News)

मोबाईल लॉन्च होण्यापूर्वीच कंपनीने OnePlus 12 च्या फीचर्सची माहिती दिली आहे. OnePlus चा आगामी स्मार्टफोन OnePlus 12 शक्तिशाली प्रोसेसरसह बाजारात उतरणार आहे. कंपनीने या फोनला Snapdragon 8 Gen ३ चिपसेट दिलीय. तसेच कंपनी अल्ट्रा फास्ट चार्जिंग फीचरसह OnePlus 12 ला लॉन्च करत आहे.

nePlus 12 हे 50W Airvooc चार्जिंग असलेले उपकरण असेल. फोन चार्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची स्ट्रिंग जोडण्याची गरज नसेल. कंपनी OnePlus 12 ला 4th Gen Hassleband कॅमेरा देणार आहे. कंपनी अत्यंत परफॉर्मन्ससह OnePlus 12 आणणार आहे. कंपनी हा फोन 16GB LPDDR5X रॅम सह आणत आहे. OnePlus मोबाईलचा वापर करताना युझर्सला कोणताच त्रास होणार नाही. डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी डिस्प्ले ब्राइटनेस 70 निट्सपेक्षा कमी असून स्क्रीन 2160Hz PWM डिमिंग करता येते.

या मोबाईलच्या कॅमेरासुद्धा बेस्ट असणार आहे. कंपनीने 1/1.4-इंच मुख्य सेन्सरसह 50MP Sony चा LYT-808 वाइड-एंगल कॅमेरा, 3X ऑप्टिकल झूमसह 64MP OV64B 3X पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा, 6X इन-सेन्सर झूम आणि Zoombrid12 सह 4th Gen Hasselblad कॅमेरा दिलाय. इतकेच नाही तर मोबाईल अवघ्या २३ मिनिटात चार्ज होईल. कंपनीने फोनमध्ये 100W वायर्ड SuperVOOC चार्जिंग सपोर्ट असेल तसेच 5,400mAh बॅटरी 50W AIRVOOC वायरलेस चार्जिंगने चार्ज करता येईल.

या मोबाईलची सर्वात महत्त्वाची आणि आपल्या आकर्षित करणारी गोष्ट, ती म्हणजे या मोबाईलची किंमत. कंपनीने अद्याप किंमतीची घोषणा केलेली नाहीये. पण एका दाव्यानुसार, 12GB RAM सह OnePlus 12 बेस व्हेरिएंटची किंमत 64,999 रुपये असेल. तर 16GB रॅम व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये असेल. हा फोन भारतात 30 जानेवारीला विक्रीसाठी येईल असा दावा केला जात आहे. OnePlus 12R फेब्रुवारीमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल असे सांगितले जातं आहे. दरम्यान Amazon वरही तुम्ही हा फोन घेऊ शकतात.

 OnePlus 12
Airtel चा सर्वात मोठा प्लान; Netflix साठी अतिरिक्त पैसा खर्च करण्याची गरज नाही; काय आहे नवीन ऑफर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com