Post Office Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम गुंतवणूक योजना; लाखो कमवण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर

Senior Citizen Savings Scheme: आजकाल सर्वजण गुंतवणूकीतून जास्त कमाई करण्याच्या संधी शोधत आहेत. पोस्ट ऑफीसने देखील जेष्ठ नागरिकांसाठी अशीच एक भन्नाट योजना आणली आहे. त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या.
SCSS
SCSS GOOGLE
Published On

Post Office Scheme SCSS

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा लोकांसाठी सरकारने सुरू केली आहे. सध्या या योजनेवर 8.2 टक्के दराने व्याज दिले जातंय. या योजनेद्वारे केवळ व्याजातून 5 वर्षांत लाखो रुपयांची कमाई होऊ शकते. SCSS आता 30 लाख रुपयांपर्यंत ठेव ठेवण्याची परवानगी देते. 2023 च्या अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यात आली होती. (Latest News)

SCSS चा कार्यकाळ

ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते (Senior Citizen Savings Scheme) किमान 1,000 रूपयाच्या ठेवीसह उघडता येते. ठेवीची मुदत 5 वर्षे आहे. ती आणखी 3 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. सरकार दर तिमाहीत SCSS वर व्याजदर निश्चित करते. सरकारने जानेवारी-मार्च 2024 तिमाहीसाठी SCSS वर व्याजदरात वाढ केलेली नाही. खातेदार त्यांच्या ठेवींवर 8.2% दराने व्याज मिळवू शकतात. व्याज प्रत्येक तिमाहीत देय आणि पूर्णपणे करपात्र आहे. SCSS खाते अधिकृत बँकेत उघडता येते. पोस्ट ऑफिसमध्ये देखील SCSS खाते उघडता येते. ( 'साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

SCSS खाते कसं उघडायचं

अर्जदाराने खाते उघडण्याचा फॉर्म भरणे आवश्यक आहे. आवश्यक KYC कागदपत्रे, छायाचित्रे आणि निवृत्ती निधीच्या पावतीच्या संदर्भात नियोक्त्याकडून प्राप्त झालेल्या पत्राची एक प्रत जोडणे आवश्यक (Senior Citizen Savings Scheme) आहे. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त SCSS खाते असू शकतात. परंतु सर्व खात्यांची एकूण ठेव मर्यादा 30 लाख रूपये आहे.

ज्येष्ठ नागरिक योजना करपात्रतेवरील व्याज

आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत SCSS कर सूट आहे. तथापि, SCSS कर लाभ रु. 1, 50,000 वर मर्यादित आहे. एका आर्थिक वर्षासाठी रु. 50,000 पेक्षा जास्त व्याजाच्या बाबतीत TDS लागू आहे, असं बँक ऑफ बडोदाने सांगितलं आहे.

SCSS
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची हमी योजना! फक्त एकदाच गुंतवणूक करा, आयुष्यभर परतावा मिळवा

विश्वसनीय आणि सुरक्षित पर्याय

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही भारत सरकारद्वारे समर्थित अल्प बचत योजना आहे. ती विश्वसनीय आणि सुरक्षित पर्यायांपैकी एक मानली जाते. या योजनेंतर्गत दर तीन महिन्यांनी व्याज दिले जाते. प्रत्येक एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीच्या पहिल्या दिवशी तुमच्या खात्यात व्याज जमा केले जाते.

या योजनेत पैसे (post office scheme) गुंतवल्यास चांगल्या प्रकारे परतावा मिळतोय. परंतु सरकारने योजनेतून लवकर बाहेर पडण्यावर नवीन निर्बंध लादले आहेत.

SCSS
Toyota New Off Roading SUV : टोयोटोची जबरदस्त एसयूव्ही येतेय; स्वस्तात मिळणार ऑफ रोडिंगची मजा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com