Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आई पद्मश्री, वडील IAS; लेक झाली IPS अधिकारी; सिमाला प्रसाद यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IPS Simala Prasad: आयपीएस सिमाला प्रसाद यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांना लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेत काम करायचे होते. यासाठी त्यांनी वडिलांकडून प्रेरणा घेतली होती.

Siddhi Hande

IPS सिमाला प्रसाद यांचा प्रवास

दुसऱ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC

कामासोबत जपतात अभिनयाची आवड

प्रशासकीय सेवेत काम करुन देशाची सेवा करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावा लागतात. दरम्यान, यूपीएससी परीक्षा देऊन ही स्वप्ने पूर्ण करतात. असंच स्वप्न सिमाला प्रसाद यांचं होतं. त्यांनी यूपीएससीसोबत थिएटरदेखील केलं होतं. त्यांना अभिनयाची खूप आवड आहे. त्यांचा एक चित्रपटदेखील आला आहे.

सिमाला प्रसाद यांची माहिती (IPS Simala Prasad Biography)

सिमाला प्रसाद यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९८० रोजी झाला. त्या मूळच्या मध्य प्रदेशच्या भोपाळच्या रहिवासी. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट जोसेफ कोएड स्कूलमधून झाले. यानंतर त्यांनी बरकतउल्ला युनिव्हर्सिटी भोपाळ येथून बीकॉम केले. यानंतर सोशलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्या कॉलेजमध्ये गोल्ड मेडलिस्ट होत्या.

कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली. त्यांची पहिली पोस्टिंग डीएसपी म्हणून झाली. यानंतर त्यांनी २०१० मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. त्यांना पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाले. शेवटी २०११ मध्ये त्यांनी परीक्षा पास केली आणि त्यांची आयपीएस पदावर निड झाली.

आई पद्मश्री, वडील आयएएस अधिकारी

सिमाला प्रसाद यांच्या आईचे नाव मेहरुनन्निसा परवेज आहेत. त्या साहित्यकार आहेत. त्यांना २००५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांनी वडील भागीरथ प्रसाददेखील आयएएस ऑफिसर होके. त्यांना कुटुंबातूनच शिक्षणाची प्रेरणा मिळाली. त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा पास केली.

सिमाला या कॉलेजमध्ये असताना थिएटर करायच्या. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले. त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले आह. त्या कामासोबत आपली आवडदेखील जपतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नगराध्यक्षपदाच्या तीन महिला उमेदवारांनी एकाचवेळी देवाला घातलं साकडं... आता देव कोणाला पावणार ?

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, अपघातामध्ये चौघेजण गंभीर जखमी

Roti Making Tips : पोळपाट- लाटणं न वापरता बनवा गोल चपाती, 'ही' आहे युनिक ट्रिक

स्वच्छ आणि निर्मळ मन! कचऱ्यात सापडले 10 लाख रुपये, काकूंनी जे केले ते ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान| VIDEO

Success Story: स्वप्नपूर्ती! अवघ्या २१ व्या वर्षी मिळवली अमेरिकेत २६ लाख पॅकेजची नोकरी; शेतकऱ्याच्या लेकाचा प्रवास वाचून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT