

पंजाबमधील अमनप्रीत कौर सैनी हिची कॅनडात हत्या
आरोपी मनप्रीत सिंहविरुद्ध गुन्हा दाखल
तरुणीच्या हत्येनंतर कॅनडा पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
अमनप्रीतच्या मृत्यूची बातमी मिळताच कुटुंबावर शोककळा
पंजाबमधून कॅनडात नोकरीसाठी गेलेल्या २७ वर्षीय अमनप्रीत कौर सैनी या तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. २७ वर्षीय मनप्रीत सिंह नावाच्या तरुणाने तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे.या प्रकरणी कॅनडा पोलिसांनी आरोपी मनप्रीत सिंहच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अमनप्रीत कौर सैनी या तरुणीचा मृतदेह लिंकन, ओंटारिया भागात आढळला. अमनप्रीत कौर सैनीच्या मृत्यूविषयी कुटुंबाला कळताच त्यांना मोठा धक्का बसला. अमनप्रीतचे वडील इंद्रजीत सिंह यांनी माध्यमांना सांगितलं की, आमची मुलगी खूप हुशार होती.ती कॅनडामध्ये एका रुग्णालयात काम करत होती. ती २०२१ साली कॅनडामध्ये राहायला गेली होती. तिला लवकरच कॅनडाचं नागरिकत्व मिळणार होतं.
मृत अमनप्रीतचे वडील इंद्रजीत सिंह यांनी सांगितलं की, अमनप्रीतने आम्हाला कधीच तिला होणाऱ्या त्रासाविषयी सांगितलं नाही. ती नेहमी आमच्याशी आनंदानेच बोलायची. तिने स्वत:च्या कमाईवर कॅनडामध्ये कार देखील खरेदी केली होती. ती कॅनडामध्ये चांगलं जीवन जगत होती'.
अमनप्रीत भारतात यायला खूप उत्सुक होती. कॅनडाचं नागरिकत्व मिळाल्यानंतर भारतात येणार होती, असेही तिच्या वडिलांनी सांगितलं. अमनप्रीतच्या काकांनी सांगितलं की, 'आम्ही अमनप्रीत बेपत्ता झाल्याची तक्रार ही २० ऑक्टोबर रोजी नोंदवली होती. पोलिसांच्या तपासात अमनप्रीतची हत्या झाल्याचे उघड झालं. तिच्या हत्येनंतर तिचा मृतदेह दोन दिवसांनी आढळला'. अमनप्रीतच्या वडिलांनी या प्रकरणात पंजाब सरकारची मदत मागितली आहे. या प्रकरणात कॅनडा पोलिसांनी आरोपी मनप्रीत सिंह याचा शोध सुरु केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.