Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: कॅन्सर-पॅरेलिसिसला हरवले, ४ सर्जरीनंतरही हरला नाही, ३८व्या वर्षी UPSCत यश; संजय डहरिया यांचा प्रवास

Success Story of Sanjay Dahariya: छत्तीसगडच्या संजय डहरिया यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांना कॅन्सर झाला होता. कॅन्सरवर मात करत त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली.

Siddhi Hande

संजय डहरिया यांचा प्रेरणादायी प्रवास

वयाच्या ३८ व्या वर्षी क्रॅक केली यूपीएससी

कॅन्सर, पॅरेलिसिस आजाराशी झुंज देत रचला रेकॉर्ड

यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी अभ्यासासोबतच जिद्द आणि मेहनत गरजेची असते. परिस्थिती कितीही वाईट असली तरी त्यावर मात करता येते. असंच काहीसं संजय डहरिया यांनी केलं. कॅन्सरची झुंज देता देता त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. याच काळात त्यांना पॅरेलिसिसदेखील झाला होता. शरीर साथ देत नसलं तरीही त्यांनी जिद्द सोडली. खूप कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. ३८ वर्षांचे असताना त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आहे.

संजय डहरिया हे मूळचे छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील बेलटुकरी गावचे रहिवासी आहे. त्यांचे वडील शेती करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती फार बेताची होती. परंतु त्यांच्या अभ्यासात कोणताही अडथळा आला नाही. त्यांच्या कुटुंबाने त्यांना सपोर्ट केला.

संजय यांनी सुरुवातीचे शिक्षण गावातील सरकारी शाळेतून घेतले. यानंतर त्यांची नवोदय विद्यालयातून शिक्षण घेतले.त्यांनी पहिल्यांचा आयएएस अधिकाऱ्यांना पाहिलं तेव्हा त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला.परंतु कुटुंबाला सपोर्ट करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला नोकरी केली.

संजय यांनी १२वीनंतर शाळेत इतर मुलांना शिकवायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडिया पोस्टमध्ये काम केले.

२०१२ मध्ये कॅन्सरशी लढाई

संजय नोकरी आणि अभ्यास दोन्ही गोष्टी केल्या. परंतु एका गोष्टीमुळे त्यांचं पूर्ण आयुष्यच बदललं. २०१२ मध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला. यानंतर पॅरेलिसिसचा झटका आला. २०१३ ते २०१५ पर्यंत त्यांच्या ४ सर्जरी झाल्या. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी एवढ्या मोठ्या संकटावर मात केली.

संजय यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. २०२२ मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. परंति त्यांना अपयश मिळाले. शेवटी २०२ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी यूपीएससी परीक्षा पास करुन नवीन इतिहास रचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील रिंग रोड आणि महामार्गांना अजित पवारांचे नाव द्या,रोहित पवारांची मागणी

Iran Israel Conflict : इराणच्या एका क्षेपणास्त्रात ८० बॉम्ब, इस्रायलवर मोठा प्रहार, क्लस्टर बॉम्ब नेमका काय आहे?

Zumba: वजन कमी करण्यासाठी झुंबा खरचं फायदेशीर आहे का?

SSC Exam : बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा मिशनचा फज्जा, दहावीचा पेपर ३ दिवस आधीच फोडला

LPG Crisis: जनता 'गॅस'वर, हॉटेल चुलीवर, हॉटेलला आता लाकडं, कोळशाचा आधार

SCROLL FOR NEXT