Success Story Saam tv
बिझनेस

Success Story: २० वेळा फेल, एकदा नव्हे तर दोनदा UPSC पास; विवेक यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of UPSC Topper Vivek Yadav: विवेक यादव यांचे आयपीएस होण्याचे स्वप्न होते. त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी याआधी २० सरकारी परीक्षा दिल्या होत्या.

Siddhi Hande

ड्रायव्हरच्या लेकाने दोनदा क्रॅक केली UPSC

२० वेळा अपयश तरी हार मानली नाही

मोठ्या जिद्दीने पास केली परीक्षा

यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि सातत्य या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. जर तुम्ही सातत्याने एखादी गोष्ट केली तर तुम्हाला कधीच अपयशाचा सामना करावा लागणार नाही. तुम्हाला एक दिवस यश हे नक्कीच मिळेल. असंच काहीसं विवेक यादव यांनी केलं. २० वेळा परीक्षेत नापास होऊनदेखील त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा दिली. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले. विवेक यादव यांनी सलग दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली.

विवेक यादव हे मध्य प्रदेशमधील चंदेरी येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील नवल सिंह यादव हे ड्रायव्हर आहेत.आई घरी शिलाईचे काम करते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र, त्यांच्या आईवडिलांनी मुलांच्या अभ्यासात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी नेहमीच मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

विवेक यादव यांनी सुरुवातीचे शिक्षण चंदेरी येथील सरस्वती विद्या मंदिर येथून पूर्ण केले. यानंतर दिल्ली विद्यापीठातून हिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीमधून इतिहास विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केले.

विवेक यादव यांनी सरकारी नोकरीसाठी परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी ५ वेळा MPPSC परीक्षा, UPPSC परीक्षा,CAPF आणि BPSC यांनी २० परीक्षा दिल्या.परंतु त्यांना परीक्षेत यश आले नाही. त्यांनी हार मानली नाही.

राज्यस्तरीय परीक्षेनंतर त्यांनी UPSC परीक्षा दिली. त्यांना २०२४ मध्ये यश मिळाले. त्यांना ४१३ रँक प्राप्त झाली. त्यांची असिस्टंट कमिश्नर रेल्वे पदासाठी निवड झाली. परंतु त्यांना आयपीएस व्हायचे होते. त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांना यश मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT