Success Story ANI
बिझनेस

Success Story: शिक्षणासाठी घरापासून ९ वर्षे लांब, सलग ४ वेळा अपयश, पाचव्या प्रयत्नात UPSC क्रॅक; सिक्युरिटी गार्डचा मुलगा होणार सरकारी अधिकारी

Success Story of UPSC Topper Jatin Jakhar: यूपीएससी परीक्षेत जतिन जाखड यांनी १९१ रँक प्राप्त केली आहे. त्यांना सलग ४ वेळा अपयश मिळाले होते. तरीही त्यांनी हार मानली नाही. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालेच.

Siddhi Hande

जतिन जाखड यांचा प्रेरणादायी प्रवास

सिक्युरिटी गार्डचा मुलगा होणार सरकारी अधिकारी

पाचव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक

तुम्ही जर मोठी स्वप्न पाहिली तर ती नक्कीच पूर्ण होतात. स्वप्नं पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत, जिद्द आणि सातत्य लागतं. तुम्हाला जे काही हवं त्या स्वप्नामागे सतत धावावं लागतं. असंच काहीसं जतिन जाखड यांनी केलं.सिक्युरिटी गार्डच्या मुलाने यूपीएससी परीक्षा पास केली आहे. सलग ४ वेळा अपयश आल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी प्रयत्न केले आणि त्याचं यश त्यांना मिळालं.

जतिन जाखड यांनी यूपीएससी २०२५ मध्ये १९१ रँक प्राप्त केली. जतिन जाखड हे मूळचे हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या पती आर्मीमधून रिटायर्ड आहेत. सध्या ते सिक्युरिटी गार्डची नोकरी करतात. कमीत कमी साधने असली तरीही जतिन यांनी आपल्या अभ्यासावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. त्यांनी यूपीएससी परीक्षेटी तयारी केली आणि पासदेखील केली.

जतिन हे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी घरापासून लांब गेले होते. त्यांचे यूपीएससी परीक्षा देण्याचे स्वप्न होते. ते ९ वर्ष आपल्या कुटुंबापासून लांब राहिले.शेवटी त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केलीच.

जतिन यांना सलग ४ प्रयत्नांमध्ये अपयश मिळाले होते. परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही. ते कधीच डगमगले नाही. त्यांनी खूप मेहनत घेतली. त्याचे फळ त्यांना मिळाले आणि आता ते सिव्हिल सर्व्हिसमध्ये सरकारी ऑफिसर होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT