Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: सिक्युरीटी गार्डच्या लेकीची भरारी! कोचिंग क्लासेसशिवाय UPSC क्रॅक ; अंकिता कांती यांचा खडतर प्रवास

Success Story of UPSC Topper Ankita Kanti: यूपीएससी परीक्षेत अंकिता कांती यांनी १३७ रँक प्राप्त केली आहे. त्यांचे वडील सिक्युरिटी गार्ड आहेत. सिक्युरिटी गार्डच्या लेकीने हे यश मिळवले आहे.

Siddhi Hande

यूपीएससी (UPSC) ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देताना अनेकदा अपयश येते. परंतु इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही यश हे मिळवू शकतात. असंच काहीसं अंकिता कांती यांच्यासोबत झालं. त्यांनाही या प्रवासात अनेक अडचणी आल्या. परंतु त्यांनी त्या सर्व अडचणींवर मात केली आणि यश हे मिळवलेच. त्यांनी यूपीएससी परीक्षेत १३७ रँक प्राप्त केली केली आहे.

अंकिता कांती यांचा प्रवास

अंकिता यांना यूपीएससी परीक्षा देताना अनेक अडचणी आल्या. मिडिया रिपोर्टनुसार, अंकिता कांती या उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील एका लहान गावातील रहिवासी आहेत. अंकिता यांचे वडील देवेश्वर कांति हे एका प्रायव्हेट कंपनीत सिक्युरिटी गार्डची नोकरी करतात. त्यांचे बँकेत कॅश पोहचवण्याचे काम आहे. त्यांची आई गृहिणी आहे. सिक्युरिटी गार्डच्या लेकीने यूपीएससी परीक्षा यश मिळवलं आहे.

लहानपणापासूनच हुशार

अंकिता कांती या लहानपणापासूनच हुशार आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, त्यांनी सुरुवातीचे शिक्षण दून मॉडर्न स्कूल तुंटोवाला येथून केले. त्यांनी १०वीत ९२.४० टक्के गुण मिळवले. १२वीच्या परीक्षेत ९६.४ टक्के मिळवले. शाळेनंतर त्यांनी डीबीएस कॉलेजमधून बी.एससी डिग्री प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी एम. एससीचे शिक्षण पूर्ण केले.

कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय मिळवलं यश

अंकिता यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय हे यश मिळवलं आहे. त्यांनी ग्रॅज्युएशनसोबतच यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी स्वतः दिवसरात्र अभ्यास करुन हे यश मिळलं आहे. त्यांनी हिंदी माध्यमातून ही परीक्षा दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT