Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: शेतजमीन भाड्याने घेऊन राबला; आता उभारली १२०० कोटींची कंपनी, तरुणाची यशोगाथा वाचून अवाक् व्हाल!

Siddhi Hande

अनेक तरुणांचा स्वतः चा बिझनेस सुरु करण्याचे स्वप्न असते.प्रत्येकजण आपला वेगवेगळा व्यवसाय सुरु करतो. एका तरुणाने चक्क शेती भाड्यावर घेऊन स्वतः चा व्यवसाय सुरु केला आहे. शेतीवर सुरु केलेल्या या व्यवसायावर त्याने कोट्यवधींची कंपनी सुरु केली आहे.

राजस्थानच्या जयपूरमधील ऋतुराज शर्माने शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. त्याने वयाच्या ३३ व्या वर्षी कोट्यवधींची कंपनी उभारली आहे. ऋतुराजने गुडगावमध्ये झेटाफार्म्स नावाची कंपनी सुरु केली आहे. ही कंपनी कॉर्पोरेट शेती करते. कॉर्पोरेट शेती म्हणजे कंपनी भाड्यावर काही शेतजमीन घेते आणि त्यावर शेती करते.

Advanced Agriculture ने दिलेल्या वृत्तानुसार, zettafarms कंपनी भाडेतत्वार जमीन घेऊन त्यावर गहू, बाजरी, धान्य, कडधान्य, चहा, कॉफीच्या मळ्यांची शेती करते. ऋतुराजने शेतीत अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत.ऋतुराजने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. एमबीएनंतर त्याने स्वतः चे स्टार्टअप सुरु केले. परंतु त्याला दोन वेळा अपयश आले. त्याचा तिसरा स्टार्टअप झेटाफार्म्स यशस्वी झालं.

झेटाफार्म्स कंपनी एका गटाकडून ५० ते १०० एकर जमीन भाडेतत्वावर घेतात.त्यात ते शेती करतात. ऋतुराजने दिलेल्या माहितीनुसार, त्याने फक्त २ एकर जमिनीत शेती सुरु केली. त्यानंतर त्याने कंपनीचा विस्तार करायला सुरुवात केली. कंपनीला पहिल्या वर्षी फक्त १ लाख रुपयांचा नफा झाला. परंतु त्यानंतर कंपनीने चांगली प्रगती केली.

एकाच ठिकाणी किंवा एकाच पिकाची शेती करणे हे जमिनीसाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची शेती करण्याचा प्रयोग त्याने केला. यानंतर त्याने ऑपरेशन्स, मॅनेजमेंट, मार्केटिंग, फायनान्स या डिपार्टमेंटचा लमावेश केला. त्यानंतर त्यांनी माती परीक्षणापासून ते शेतीसाठी आवश्यक गोष्टींमध्ये तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. आज या कंपनीची वॅल्यू १२०० कोटी रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

SCROLL FOR NEXT