आई वडिलांनी जमीन विकली, मोलमजुरी केली; पोरीने नाव काढलं! वाचा Deepthi Jeevanji चा प्रवास

Deepthi Jeevanji Struggle Story: भारतीय पॅरा अॅथलिट दीप्ती जीवनजीने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत शानदार कामगिरी करत ४०० मीटर टी -२० प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.
आई वडिलांनी जमीन विकली, मोलमजुरी केली; पोरीने नाव काढलं! वाचा Deepthi Jeevanji चा प्रवास
deepthi jeevanjitwitter
Published On

भारतीय महिला पॅरा ॲथलिट दीप्ती जीवनजीने महिलांच्या ४०० मीटर टी -२० प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. स्पर्धेतील सहाव्या दिवशी भारताला ४ पदकं जिंकण्याची संधी होती. मात्र फायनलमध्ये भारतीय खेळाडूंच्या हाती निराशा आली आहे.

दरम्यान दीप्ती जीवनजीने (Deepthi Jeevanji) फायनलमध्ये ५५.८२ सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. हे भारतासाठी या स्पर्धेतील १६ वे पदक ठरले आहे. सोमवारी एकाच दिवशी ८ पदकं जिंकल्यानंतर मंगळवारी हे भारतासाठी पहिलं पदक ठरलं. (Paris Paralympics)

२० वर्षीय दीप्ती या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर राहिली. तर युक्रेनची यूलिया शुलियार (५५ .१६ सेकंद) अव्वल स्थानी राहिली. तर आयसेल ओंडर (५५.२३ सेकंदासह ) दुसऱ्या स्थानी राहिली.

आई वडिलांनी जमीन विकली, मोलमजुरी केली; पोरीने नाव काढलं! वाचा Deepthi Jeevanji चा प्रवास
Paris Paralympics 2024 Schedule: भारताला आजही 4 पदकं मिळणार? Avani Lekhara रचणार इतिहास; पाहा वेळापत्रक

अशी राहीलीये कारकीर्द

दीप्तीने वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेतही तिने शानदार कामगिरी केली. मात्र तिचं सुवर्ण आणि रौप्य पदक काही सेकंदांमुळे हुकलं. ती फायनलमध्ये ०.६६ सेकंद मागे राहिली.

यापूर्वी प्रीती पालने सलग २ पदकं जिंकत इतिहास रचला आहे. प्रीतीने १०० मीटर आणि २०० मीटर टी 35 प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली. दीप्तीने यावर्षी शानदार कामगिरी करून दाखवली आहे. यापूर्वी पॅरा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप स्पर्धेच्या ४०० मीटर टी 20 स्प्रिंट प्रकारात ५५.०७ सेकंदाची नोंद करत वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता.

असा राहिलाय प्रवास

तेलंगणातील वारंगण जिल्ह्यातील कलेडा गावात जन्मलेल्या दीप्तीने आतापर्यंत पॅरा ॲथलेटीक्स इव्हेंटमध्ये शानदार कामगिरी करून दाखवली आहे. बौद्धिकरित्या दुर्बळ आणि गरिबी असूनही तिने सर्व अडथळे मागे सोडत तिने आपली छाप सोडली आहे.

दीप्तीचे आई वडील मोल मजुरी करून कुटुंबाचा सांभाळ करायचे. त्यांना आपली जमीनही विकावी लागली होती. मात्र या सर्व अडचणींवर मात करत तिने आपली छाप सोडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com