Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: १३व्या वर्षी दहावी पास, १९ व्या वर्षी CA; नंदिनी अग्रवालने रचला केला नवा रेकॉर्ड

Success Story Of Youngest CA Nandini Agarwal: नंदिनी अग्रवाल ही देशातील सर्वात तरुण सीए झाली आहे. १९ व्या वर्षी तिने हे यश मिळवले आहे. तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.

Siddhi Hande

आयुष्यात प्रत्येकालाच खूप लवकरच यश मिळवायचं असतं, आपली स्वप्न पूर्ण करायची असतात. परंतु कधीकधी वेळ निघून जातो अन् स्वप्नं अपूर्ण राहतात. परंतु वेळ ही एकमेव गोष्ट आहे जी आपल्याकडे आहे. तिचा आपण योग्य वापर करायला हवा. असंच काहीसं सीए नंदिनी अग्रवाल यांनी केलं. त्यांनी खूप मेहनतीने अभ्यास केला. त्या भारतातील सर्वात तरुण CA आहेत. त्यांनी फक्त १९ व्या CA ची परीक्षा पास केली.

नंदिनी अग्रवालने संपूर्ण देशात ऑल इंडिया रँक १ प्राप्त केली आहे. फक्त १९ व्या वर्षी त्यांनी हे यश मिळवलं आहे. त्यांचा हा रेकॉर्ड गिनीज गुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे. नंदिनी मूळच्या मध्य प्रदेशच्या मुरैना शहरातील रहिवासी आहेत. त्यांनी सीएच्या परीक्षेत संपूर्ण देशात पहिली क्रमांक प्राप्त केला आहे.नंदिनी यांनी शाळेत असताना २ वर्षे पुढच्या वर्गात अॅडमिशन घेतला. त्यांनी ८वीनंतर थेट १०वीत अॅडमिशन घेतले. यामुळे त्यांचा वेळ वाचला.

नंदिनी अग्रवाल यांनी वयाच्या १३ व्या वर्षी १०वीची परीक्षा पास केली. १५ व्या वर्षी १२वीची परीक्षा पास केली. ज्या वयात मुले १०वी पास करतात त्याच वयात नंदिनी यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली.

नंदिनी यांच्या कुटुंबातील सदस्यदेखील खूप हुशार आहेत. त्यांच्या भावाने ऑल इंडिया रँक १८ प्राप्त केली. नंदिनी यांना त्यांच्या भावाकडून प्रेरणा मिळाली. त्यांनी शाळेत असतानाच नवीन रेकॉर्ड बनवायचे ठरवले होते. नंदिनी यांनादेखील खूप अडचणी आल्या. त्यांना १६ व्या वर्षी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अप्रेंटिस पदासाठी अप्लाय केले होते. परंतु त्यांना संधी मिळाली नाही.परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी शेवटी सीए परीक्षा पास केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT