ऑपरेशन सिंदूरचं सुंदरकांड कनेक्शन... राजनाथ सिंह म्हणाले, प्रभू हनुमानाकडून घेतली प्रेरणा

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत ७० दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पाकिस्तानातील ९ तळ उद्ध्वस्त केले. रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कराच्या शौर्याचे कौतुक करत सुंदरकांडाशी याची तुलना केली.
Operation Sindoor
Operation SindoorX
Published On

Operation Sindoor Pahalgam revenge : पहलगाममध्ये निष्पाप पर्यटाकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मरून भारताने बदला घेतला. भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांची ९ तळ नष्ट केले. २५ मिनिटांत भारताच्या लष्कराने पाकिस्तानवर स्ट्राइक करत अद्दल घडवली. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २५ भारतीय महिलांचे कुंकू पुसले होते, याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवत ७० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराचे कौतुक केले जातेय. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराच्या शौर्याचे कौतुक करताना रामायणातील सुंदरकांडाशी या ऑपरेशनचा संबंध जोडला. आम्ही हनुमानजींच्या त्या आदर्शाचे पालन केले, ज्याप्रमाणे त्यांनी अशोक वाटिकेत फक्त शत्रूंना लक्ष्य केले. “ज्यांनी मला मारले, त्यांनाच मी मारले.” आम्ही केवळ त्या दहशतवाद्यांना मारले, ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांचे जीव घेतले, असे राजनाथ सिंह म्हणाले.

भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मिसाइल हल् केले. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्याचे नऊ तळ नष्ट केले आणि ७० दहशतवाद्यांना मारले. रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी या कारवाईनंतर पहिल्यांदा बोलताना रामायणातील सुंदरकांडाशी या ऑपरेशनचा संबंध जोडला आणि भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक केले. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या (BRO) स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत ते बोलत होते.

Operation Sindoor
Opration Sindoor: ऑपरेशन सिंदूर' कोणत्या शस्त्रास्त्रांचा हल्ल्यात वापर? VIDEO

राजनाथ सिंह म्हणाले, ऑपरेशन सिंदूर हे प्रभू हनुमानाच्या सुंदरकांडातील आदर्शांवर आधारित आहे. ज्याप्रमाणे हनुमानजींनी अशोक वाटिकेत रावणाच्या सैन्याला लक्ष्य केले होते. त्याचप्रमाणे आमच्या सैन्याने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.

सुंदरकांडातील चौपाई :

“जिन्ह मोहि मारा, तिन मोहि मारे। तेहि पर बांधेउं तनयं तुम्हारे। मोहि न कछु बांधे कइ लाजा। कीन्ह चहउं निज प्रभु कर काजा।”

याचा अर्थ,

“आम्ही हनुमानजींच्या त्या आदर्शाचे पालन केले, ज्याप्रमाणे त्यांनी अशोक वाटिकेत फक्त शत्रूंना लक्ष्य केले. “ज्यांनी मला मारले, त्यांनाच मी मारले.” आम्ही केवळ त्या दहशतवाद्यांना मारले, ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांचे जीव घेतले.”

Operation Sindoor
Operation Sindoor : 'एक चिमूट सिंदूरची किंमत...' पाकडे कधीच विसरणार नाहीत, भारतानं १०० किमी घरात घुसून अद्दल घडवली

राजनाथ सिंह म्हणाले की, 'भारतीय सैन्याने राफेल जेट्स, स्कॅल्प मिसाइल्स आणि डीआरडीओच्या ड्रोन्सद्वारे २५ मिनिटात दहशतवाद्याचे नऊ तळ नष्ट केले होते. मुरिदके, सियालकोट, बहावलपूर, मुजफ्फराबाद येथील जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या तळांचा नाश केला. हा हल्ला अचूक आणि संवेदनशीलतेने केला. '

पाकिस्तानने भारताच्या या हल्ल्यांना “बिनबुडाचे” ठरवत युद्धाची धमकी दिली. यामुळे नियंत्रण रेषेवर (एलओसी) तणाव वाढला. पुंछ, राजौरी, बारामुल्ला आणि कुपवाडा येथे गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाला. भारताने हवाई आणि समुद्री सीमा सतर्क केल् आहेत. नौदलाने अरबी समुद्रात युद्धनौका तैनात केल्या आहेत. सीमावर्ती गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com