Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ४०वेळा फेल, १२ वर्षांच्या मेहनतीनंतर स्वप्न सत्यात उतरले; शेतकऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Success Story of MPPSC Topper Manoj Pal: मनोज पाल यांनी जवळपास ७ व्या प्रयत्नात एमपीपीएससी परीक्षा पास केली. त्यांना ४० वेळा अपयश मिळाले होते. परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही.

Siddhi Hande

मनोज पाल यांचा प्रेरणादायी प्रवास

शेतकऱ्याच्या लेकाने पास केली MPPSC परीक्षा

१२ वर्षांच्या मेहनतीनंतर मिळाले यश

स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. केंद्रीय लोकसेवा आयोगासोबतच राज्य लोकसेवा आयोगाच्याही परीक्षा अवघड असतात. ही परीक्षा पास केल्यानंतर तुम्हाला तुमच्याच राज्यात ऑफिसर होण्याची संधी मिळते. मनोज पाल यांनीदेखील मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली. शेतकऱ्याच्या लेकाची अधिकारी पदासाठी वर्णी लागली आहे.

मनोज पाल हे ४० परीक्षांमध्ये अपयशी ठरले होते. नापास झाल्यानंतरही त्यांनी हिम्मत सोडली नाही. त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले. याच प्रयत्नाचे यश त्यांना मिळाले. मनोल पाल यांना ४० परीक्षांमध्ये अपयश मिळाले होते. परंतु तरीही त्यांनी हिम्मत सोडली नाही. त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले. १२ वर्षानंतर त्यांचे स्वप्न सत्यात उतरले आणि त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली.

मनोज पाल यांचे बालपण एका लहान गावात गेले. तिथे शिक्षणासाठी खूप कमी साधने होती. त्यांनी १२वीत फक्त ५० टक्के गुण प्राप्त केले होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती त्यामुळे सरकारी नोकरी करुन त्यांनी घराची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला.

एमपीपीएससी परीक्षेची तयारी करण्यासोबतच त्यांनी इतर परीक्षांसाठीही परीक्षा दिली आहे. त्यांनी सलग ६ वेळा एमपीपीएससी परीक्षा दिली होती. त्यांना ४० परिक्षांमध्ये अपयश मिळाले होते. परंतु त्यांनी हार मानली नाही.

आर्थिक परिस्थिती फार बरी नव्हती. त्यांनी त्यांनी अभ्यास करता करता मुलांना शिकवण्यास सुरुवात केली. त्याच्यासोबतच कंटेट रायटिंगदेखील सुरु केली.याचा त्यांनाच फायदा झाला. जवळपास १२ वर्षानंतर त्यांनी एमपीपीएससी परीक्षा पास केली. दिवसरात्र एक करुन त्याने हे यश मिळवलं आहे. शेतकऱ्याच्या लेकाने मिळवलेले हे यश सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

SCROLL FOR NEXT