आयुष्यात परिस्थिती माणसाला सर्वकाही शिकवते. जर तुम्ही परिस्थितीशी दोन हात केले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. असंच काहीसं मीरा कुलकर्णी यांच्यासोबत झाले. ज्या वयात आपण सेटल होतो त्या वयात त्यांनी आपला स्वतः चा व्यवसाय सुरु केवा. मीरा यांनी वयाच्या ४५ व्या वर्षी स्वतः चा व्यवसाय सुरु केला. तर या कंपनीची किंमत ८००० कोटींपेक्षा जास्त आहे. (Success Story)
मीरा कुलकर्णी यांची संपत्ती १२०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.फॉर्च्युन मासिकाने त्यांना भारतातील सर्वात शक्तीशाली महिला म्हणून मान दिला.
मीरा कुलकर्णी या फॉरेस्ट एसेंशियलच्या संस्थापक आणि सीएमडी आहे. मीरा कुलकर्णी यांनी आईवडिल गेल्यानंतर स्वतः चा व्यवसाय सुरु केला. आज या व्यवसायाची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.मीरा कुलकर्णींचा जन्म १९५८ रोजी उत्तराखंडमधील टिहरी गढवाल येथे झाला. शिमला येथील लोरेटो कॉन्व्हेंटमधून त्यांनी पदवी प्राप्त केले. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी पालकांच्या आग्रहाखातर लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येऊ लागल्या. त्यांना समर्थ आणि दिव्या नावाची मुले आहेत. (Success Story Of Mira Kulkarni)
मीरा यांचे आई वडिल त्यांचे एकमेव आधार होते. आईवडिल गेल्यानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या घराचा एक भाग भाड्याने दिला. त्यातून त्यांना रोजगार मिळाला. मीरा यांच्या घराच्या परिसरात नेहमी लाइट जायची. त्यामुळे मेणबत्त्या लावाव्या लागत. या मेणबत्त्यांचे मेण लवकर वितळत होते. मीरा यांनी ते मेण वितळून पुन्हा मेणबत्त्या तयार केल्या. वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी या व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. त्यांनी दोन लाख रुपयांच्या भांडवलासह हा व्यवसाय सुरु केला.
मीरा कुलकर्णी यांनी गॅरेजमधून मेणबत्त्या बनवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी साबण बनवण्याचेही शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी १०० टक्के आयुर्वेदिक घटक घेऊन स्किनकेअर उत्पादने तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हे प्रोडक्ट्य बाजारात विकले.
२००८ पर्यंत त्यांचे भारतात ७ स्टोअर्स उघडले. त्यानंतर त्यांनी स्वतः चा व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला. मीरा कुलकर्णी यांची संपत्ती १२९० कोटी रुपये आहे. त्यांना २०२६ मध्ये वोग इंडिया ब्युटी अवॉर्डने सन्मानित केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.