
मंगेश कचरे, साम टीव्ही प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात पाण्याची उपलब्ध कमी असल्याने या भागातील शेतकरी फळबागाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत यामध्ये पेरू आंबा चिकू डाळिंब बोर द्राक्ष अशा फळबागाच्या माध्यमातून चांगले उत्पादन घेत आहेत.रोहन अगंद मखरे या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर कश्मिरी अँपल बोराची फळबाग फुलवली आहे. शेतातील उत्तम व्यवस्थापना मुळे त्यांना भरघोस उत्पादन मिळाले आहे. (Success Story Of Farmer)
इंदापूरच्या दक्षिणेला पुणे-सोलापूर बाह्यवळण मार्गांवर रोहन मखरे यांची वडिलोपार्जित ८ एकर विहीर बागायत शेती आहे.त्यापैकी १ एकरावर त्यांनी ९×१२ अंतरावर ४५० कश्मिरी अॅपल बोराच्या रोपांची लागण केली.पश्चिम बंगाल च्या कोलकत्ता येथून त्यांनी ४० रुपयांना एक या दराने बोराचे रोप खरेदी केले. (Indapur Farmer Grow Kashmiri Apple)
शेणखत,कीटकनाशक, बुरशीनाशक, मजुरी व इतर असा मखरेंना ५० ते ६० हजार रुपये एकूण खर्च आला.गेल्यावर्षी दर कमी असूनही त्यांना दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न मिळाले, परंतू यंदा त्यांच्या कश्मिरी अँपल बोराला स्थानिक बाजारासह पुणे, सोलापूर, हैदराबाद येथील बाजारात मोठी मागणी आहे. आत्तापर्यंत जवळपास ५ टन माल विकला गेला आहे. त्यातून दोन लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.
बोरांना जानेवारी, फेब्रुवारीत मोठी मागणी असते. मात्र बहुतांश बोरांची आवक या काळात संपलेली असते. मात्र आपल्या बागेतील बोरांची तोड पुढील अडीच महिने नित्याने चालू राहील. सध्या कश्मिरी अँपल बोराला ४५ ते ५० रुपये सरासरी दर मिळत आहे.त्यामुळे अजून २० टनाहून अधिक माल निघून ८ ते १० लाख रुपये एकूण उत्पन्न मिळेल अशी माहिती रोहन मखरे यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.