Inspirational Story: ७५ वर्षीय आजोबांची कमाल! एकदा गुंतवले ५ हजार आता महिन्याला कमावतात लाखो रुपये

Inspirational Story: तळेगाव दाभाडेच्या एका ७५ वर्षीय आजोबांनी मध विकून महिन्याला लाखो रुपये कमावले आहेत. त्यांनी घरातच मधमाश्यांचे पालन करुन हा व्यवसाय सुरु केला आहे.
Inspirational Story
Inspirational StorySaam Tv
Published On

दिलीप कांबळे साम न्यूज मावळ

शेती व्यवसाय करून वर्षाला लाखो रुपयांची उलाढाल करत असल्याच्या अनेक शेतकऱ्यांची उदाहरणे आहेत. परंतु चक्क मध विकून लाखो रुपयांची उलाढाल मावळच्या तळेगाव दाभाडे मधील एक जेष्ठ नागरिक करत आहे. घरातच मधमाशांचं पालन करून वर्षाला 3 टन मध काढून त्यातून लाखो रुपयांची उलाढाल नेमकी कशी केली जाते ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Inspirational Story)

मावळच्या तळेगाव दाभाडे येथे राहणारे हे आहे विजय महाजन. लहान मुलांना गडकिल्ले फिरवण्यासाठी घेऊन जात असे. त्यावेळी अनेक आदिवासी हे मधमाशीचे पोळे जाळून त्यातून मध काढून विकून आपला उदरनिर्वाह करताना त्यांनी पाहिले. पण मधमाशा असच जाळत नष्ट होऊ लागल्या तर मानवाला अन्न भविष्यात मिळणार नाही. त्यामुळे महाजन यांनी या आदिवासी बांधवांना अधिकृत मधमाशी पालन प्रशिक्षण घेण्यासाठी आग्रह केला. मात्र आदिवासी समाजातील नागरिकांची आर्थिक स्थिती नसल्याने हे प्रशिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यामुळे महाजन यांनी स्वतःच मधमाशी पालन प्रशिक्षण घेऊन या आदिवासी भागातील बांधवांना प्रशिक्षण दिले. त्यातून आता आदिवासी भागातील बांधवांना देखील आर्थिक स्रोत निर्माण झाला आहे... (Success Story)

Inspirational Story
Success Story: २० व्या वर्षी पतीचं निधन, SBI मध्ये झाडू मारला; टॉयलेट साफ केलं, त्याच बँकेत झाल्या अधिकारी

विजय महाजन यांनी तळेगाव दाभाडे येथे राहत्या घरी मधमाशी पालन व्यवसाय सुरू करून अनेक किलो मध ते जमा करू लागले. कालांतराने मुंबई, पुणे या भागासह महाराष्ट्र भरात महाजन यांच्या मधाला मागणी येऊ लागली. मधमाशी पालन करण्यासाठी त्यांना एकदाच 2 ते 5 हजार इतका खर्च आला आहे. तर उत्पन्न हे लाखोंमध्ये मिळू लागला आहे. मागील 30 वर्षांपासून महाजन हे मधमाशी पालन करून मध विक्रीचा व्यवसाय करत आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रात विजय महाजन यांना प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित केले जाते. दरम्यान मध काढताना योग्य प्रशिक्षण घेऊन जर काढले तर मधमाशा नाहीशा होणार नाही. पारंपरिक पद्धतीने मोळ जाळून त्यामधल्या मधा माशाही जळून जातात. मावळ सह पुण्यामधूनही मध काढायला खास आम्हाला बोलावलं जातं.

Inspirational Story
Success Story: एकदा दोनदा नव्हे ६ वेळा अपयश, हार मानली नाय, UPSC क्रॅक केलीच; IAS के जयगणेश यांचा प्रेरणादायी प्रवास

तरुण पिढीने मधमाशी पालन करून या व्यवसायात येण्याची गरज आहे.. येणाऱ्या काळात सुशिक्षित असून देखील नोकऱ्या सगळ्यांना मिळणं अवघड असल्याने आताच्या तरुण पिढीने या व्यवसायात यावं अस आवाहन केले आहे...

Inspirational Story
Success Story: १३ व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपलं; लंडनमधील ऑफर नाकारली; चौथ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; प्रेरणा सिंह यांची यशोगाथा वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com