Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: झाडूने बदललं आयुष्य, २५ हजारात सुरु केला व्यवसाय, आज कमावते १२ लाख रुपये, सोनिकाची सक्सेस स्टोरी वाचा

Success Story Of Sonika: मेरठच्या सोनिकाचे आयुष्य एका झाडूने बदलले आहे. तिने २५ हजारात व्यवसायात सुरु आहे. आज या व्यवसायातून ती लाखो रुपये कमावते.

Siddhi Hande

आयुष्यात मेहनत आणि कामात सातत्य ठेवल्याने प्रत्येक व्यक्ती यशस्वी होते. असंच यश मेरठच्या सोनिका यांना मिळालं आहे. २५ हजार रुपयांपासून सुरु केलेल्या बिझनेसमधून आज त्या लाखोंचं उत्पन्न कमावतात. मेरठच्या राली चौहान गावातील सोनिका यांची ही स्टोरी आहे. त्या इतर महिलांसाठी एक आदर्श आहेत. (Business Success Story)

सोनिका यांनी फक्त २५ हजारात व्यवसायाची सुरुवात केली. सोनिका यांचा प्रवास सोपा नव्हता. सोनिकाचा नवरा घराला रंगकाम करायचा. त्यामुळे उत्पन्न फार कमी होते. कधी काम असायचे तर कधी नसायचे. त्यामुळे कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण व्हायचे. परंतु सोनिकाने या परिस्थितीवर मात करायचे ठरवले. (Success Story)

सोनिका झाडू बनवायला सुरुवात केली. सोनिकाने घरीच झाडू बनवले. त्यानंतर हळहळू त्यांनी बनवलेल्या झाडूची मागणी वाढू लागली. सोनिकाने जेल चुंगी येथून झाडू बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर त्यांनी २५ हजार रुपये गुंतवून झाडू बनवण्याचा व्यवसाय सुरु केला.

सोनिकाने बनवलेले झाले अनेक दुकानदारांना खूप आवडले. त्यांनी ते झाडू विकत घेतले. यानंतर ऑर्डर वाढू लागल्या. त्यानंतर सोनिकाचा नवरा आणि गावातील महिलांनीदेखील या व्यवसायात हातभार लावायचे ठरवले. पूर्वी सोनिका झाडू बाजारात घेऊन जात असेल. परंतु आज ती ट्रकने मालाचा पुरवठा करते. तिचे झाडू दिल्लीतदेखील विकले जातात. सोनिकाचा नवरा आता मार्केटिंगचे काम करतो. आता त्यांची उलाढाल जवळपास १० ते १२ लाखांच्या घरात आहे. सोनिका प्रशिक्षित महिलांना रोज ८०० ते १००० रुपये देते.

सोनिका मेरठच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी जाते. आज ती महिलांसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे. त्यांचे मेहनत आणि समर्पण हे त्यांच्या यशाचे कारण आहे. (Broom Making Business)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Season: थंडीच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

Anupam Kher: वयाच संबंध नाही! या व्यक्तीनं चालवली सर्वात छोटी सायकल, अनुपम खेर यांनी पोस्ट केला व्हिडीओ

Maharashtra News Live Updates: देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई - संजय राऊत

Health Tips: महिलांनी 'या' समस्येत अननसाचे सेवन करणे टाळावे

Jalgaon News: जळगावात सोन्याची गाडी पकडली, ५ कोटींचं घबाड जप्त

SCROLL FOR NEXT