Dhanteras 2024: आजच्या दिवशी झाडूची खरेदी का केली जाते? झाडू विकत घेतल्यानंतर काय केलं पाहिजे?

Dhanteras Broom Purchase : धनत्रयोदशीच्या दिवशी झाडूची खरेदी करण्यात येते. दिवाळीच्या या दिवसाचा स्वच्छतेशी संबंध असल्याने तो प्रामुख्याने झाडूशी संबंधित आहे.
Dhanteras Broom Purchase
Dhanteras Broom Purchase saam tv
Published On

हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा मोठा सण मानला जातो. आज धनत्रयोदशी असून या सणाला सुरुवात झाली आहे. धन त्रयोदशीच्या दिवशी धनकुबेर आणि मां लक्ष्मीची पूजा करण्यात येते. आज धनत्रयोदशीच्या दिवशी झाडूची खरेदी करण्यात येते. दिवाळीच्या या दिवसाचा स्वच्छतेशी संबंध असल्याने तो प्रामुख्याने झाडूशी संबंधित आहे.

सोन्या-चांदीसोबत झाडूचीही करा खरेदी

आज धनत्रयोदशी असून आजच्या दिवशी झाडूची खरेदी फार शुभ मानली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने -चांदीचीच नव्हे तर झाडूचीही खरेदी कऱण्यात येते. धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणं फार लाभदायक मानलं जातं. असं म्हणतात की, धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी आपल्या सोबत राहतो. जर तुम्ही आजच्या दिवशी झाडूची खरेदी केली तर तुम्हाला आयुष्यात कधीही नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागणार नाही.

Dhanteras Broom Purchase
Diwali 2024: दिवाळीला गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी? घरात येईल सुख-समृद्धी

हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा मोठा सण मानला जातो. आज धनत्रयोदशी असून या सणाला सुरुवात झाली आहे. धन त्रयोदशीच्या दिवशी धनकुबेर आणि मां लक्ष्मीची पूजा करण्यात येते. आज धनत्रयोदशीच्या दिवशी झाडूची खरेदी करण्यात येते. दिवाळीच्या या दिवसाचा स्वच्छतेशी संबंध असल्याने तो प्रामुख्याने झाडूशी संबंधित आहे.

सोन्या-चांदीसोबत झाडूचीही करा खरेदी

आज धनत्रयोदशी असून आजच्या दिवशी झाडूची खरेदी फार शुभ मानली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने -चांदीचीच नव्हे तर झाडूचीही खरेदी कऱण्यात येते. धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणं फार लाभदायक मानलं जातं. असं म्हणतात की, धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी आपल्या सोबत राहतो. जर तुम्ही आजच्या दिवशी झाडूची खरेदी केली तर तुम्हाला आयुष्यात कधीही नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागणार नाही.

मंदिरात झाडू दान करणं असतं शुभं

धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करण्यासोबतच मंदिरात झाडू दान करणं देखील खूप शुभ मानलं जातं. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, असं शास्त्रात नमूद करण्यात आलं आहे. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.

धनत्रयोदशीला कधी खरेदी कराला झाडू?

आता तुमच्या मनात प्रश्न असेल की आजच्या दिवशी झाडूची खरेदी कधी केली पाहिजे? धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा दुपारनंतर आणि सूर्यास्तापूर्वी झाडू खरेदी करणं शुभ आहे. रात्री झाडू खरेदी केल्याने अशुभ फळ मिळण्याचा धोका असतो, त्यामुळे रात्रीच्या वेळेस झाडू खरेदी करू नये.

Dhanteras Broom Purchase
Dhanteras 2024: आज धनत्रयोदशीच्या दिवशी राहू काळाचं सावट; 'या' वेळेवर चुकूनही खरेदी करू नका

कोणती झाडू विकत घ्यावी?

धनत्रयोदशीच्या दिवशी फक्त फुलाझाडू किंवा सींक झाडू खरेदी केला पाहिजे. पण प्लास्टिक झाडू घेऊ नका. तसेच झाडू कधीही उभा ठेवू नका. झाडू नेहमी आडवा ठेवणे शुभ असते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com