Success Story SaamTv
बिझनेस

Success Story: आधी घरोघरी जाऊन विकायचे पेन; आता आहेत २३०० कोटींच्या कंपनीचे मालक

Kunwer Sachdeva : आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही मेहनत आणि इच्छा असेल तर आपण यशस्वी होऊ शकतो. असंच काहीस व्यक्तीमत्तव म्हणजे कुंवर सचदेव. कुंवर सचदेव यांना इन्व्हर्टर मॅन म्हणून ओळखले जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kunwer Sachdeva Owner Of Su Kam Communication System :

आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही मेहनत आणि इच्छा असेल तर आपण यशस्वी होऊ शकतो. जगात अनेक लोकांनी खूप समस्येतून मार्ग काढत आज नावलौकिक कमावले आहे. असंच काहीस व्यक्तीमत्तव म्हणजे कुंवर सचदेव. कुंवर सचदेव यांना इन्व्हर्टर मॅन म्हणून ओळखले जाते. ते Su-Kam या कंपनीचे संस्थापक आहेत. Su-Kam कंपनीच्या सोलार उत्पादनाला देश विदेशात मागणी आहे.

लहानपणी पेन विकून शिक्षण पूर्ण केले

कुंवर सचदेव यांचे वडील रेल्वेमध्ये लिपिक होते. कुंवर सचदेव यांनी प्राथमिक शिक्षण खासगी शाळेत केले. परंतु परिस्थितीमुळे त्यांनी आपले शिक्षण सरकारी शाळेत पूर्ण केले. कुंवर यांना डॉक्टर व्हाचे होते. परंतु वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश न मिळाल्याने त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. कुंवर यांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घरोघरी जाऊन पेन विकले होते.

व्यवसायाची सुरूवात

शिक्षण पूर्ण झाल्यावर कुंवर यांनी एका केबल कम्युनिकेशन कंपनीच्या मार्केटिंग विभागात काम करु लागले. याच काळात त्यांना केबल व्यवसाय भविष्यात खूप फायदेशीर ठरेल असे त्यांना वाटले. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून स्वतः चा व्यवसाय सुरू केला. कुंवर सचदेव यांनी Su-Kam Communication System या नावाने व्यवसाय सुरू केला.

इन्व्हर्टर कंपनीची सुरूवात

कुंवर सचदेव यांच्या घरात इन्व्हर्टर होता. तो वारंवार खराब व्हायचा. हा इन्व्हर्टर त्यांनी एकदा उघडून पाहिला. त्यात वापरण्यात आलेले साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांना स्वतः इन्व्हर्टर बनवण्याचा विचार केला. १९९८ मध्ये त्यांनी Su-Kam Communication System स्थापन केली आणि इन्व्हर्टर बनवले. आज कुंवर सचदेव हे २३०० कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. या कंपनीत सौरउत्पादनात बनवली जातात. हे सौरउत्पादन १० तास वीज देऊ शकतात. त्यांची ही उत्पादने आज लाखांहून अधिक घरांमध्ये बसवण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT