वाहन उत्पादनातील BMW ही आघाडीची कंपनी आहे. कंपनीचे वाहने या साहसी ट्रीपसाठी आणि प्रिमियम म्हणून ओळखले जातात. BMW इंडियाने भारतात कंपनीची सर्वात महागडी बाईक M 100 RR ची डिलिव्हरी सुरू केली आहे.
किंमत
BMW M 100 RR बाईकची किंमत ४९ लाख रुपये आहे. तर सध्याच्या व्हर्जनची किंमत ५५ लाख रुपये आहे. कंपनीची ही नवीन बाईक S 1000 RRवर आधारित सुपरस्पोर्ट बाइक आहे. कंपनीची ही बाईक चांगली डिझाइन आणि नवीन बॉडीसह लाँच केली आहे. या बाईकची डिझाइन S 1000 RR पेक्षा चांगले आहे. या बाईकमध्ये अनेक अपडेट्स करण्यात आले आहेत. BMW ची M 100 RR बाईक ही रेससाठी तयार केलेल्या मशीनसारखी दिसते.
BMW M 100 RR बाईकला 999cc इनलाइन, 4- सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 211bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. BMW ची ही बाईक 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडली गेली आहे. या बाईकमध्ये बाय डायरेक्शनल क्विकशिफ्टर मिळते. तसेच बाइकमध्ये इलेक्ट्रॉनिक रायडर सपोर्टदेखील आहेत. यात ABS टेक्नोलॉजी , ट्रेक्शन कंट्रोल , स्लाइड कंट्रोल, 7 राइड मोड, लाँच कंट्रोल, व्हील कंट्रोल, स्टेअरिंग स्टेबलायजर, क्रुझ कंट्रोल, ड्रॉप सेंसर आणि हिल स्टार्ट देण्यात आले आहेत.
BMW च्या या बाईकच्या हार्डवेअरमध्ये USD फ्रंट फोर्क्स आणि रिबाउंड, कॉम्प्रेशन आणि प्रीवोज अॅडजस्टॅबिलिटीसह मोनोशॉकचाही समावेश आहे. यात ब्रेक्समध्ये ड्युअल 320 मिमी डिस्क आणि ड्युअल चॅनल ABS तंत्रज्ञानासह सिंगल 220 मिमी मागील युनिट समाविष्ट आहे. BMW च्या या बाइकला भारतातील Ducati Panigale V4R बाईक स्पर्धा करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.