यूट्यूबर आणि मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा हे अनेक तरुणांना प्रेरणा देतात. संदीप महेश्वरी हे डिप्रेशनमध्ये गेलेल्या तरुणाईला बळ देते तर विवेक बिंद्रा हे तरुणांना उद्योजक होण्याच्या टिप्स देते. परंतु, मागच्या काही दिवसांपासून या दोन्ही व्यक्ती पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
संदीप माहेश्वरीने काही दिवसांपूर्वीच यूट्युब चॅनेलवर एक व्हिडिओ अपलोड केला. ज्यामध्ये ते दोन मुलांशी बोलताना दिसून येत आहे. त्यांच्यावर अन्याय झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्या दोन्ही मुलांचे म्हणणे आहे की, आपली 'YouTuber' चा कोर्स घेतला होता पण फायदा झाला नाही. ते म्हणाले बिझनेसमनऐवजी (Business) सेल्समन तयार करत आहेत.
त्यातील एकाने हा कोर्स ५० हजार रुपयांना (Price) तर एकाने ३५ हजारांना घेतला. मुलांनी सांगितले की, हा कोर्स पुढे त्यांना अधिक लोकांना विकण्यास सांगितला. हे एक प्रकारचे मल्टी लेव्हल मार्केटिंग आहे. यामध्ये विविध स्तर असून १० लाखांपर्यंतचे कोर्सेस आहेत. यामध्ये प्रशिक्षणही दिले जाते. हा व्हिडीओ (Video) पोस्ट झाल्यानंतर माहेश्वरींना तो काढून टाकण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
माहेश्वरीच्या या पोस्टनंतर विवेक बिंद्राने देखील एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी एकमेकांना चॅलेज केलेले पाहायला मिळाले. यानंतर लोकांना कळाले की, सर्व घटना ही विवेक बिंद्रा यांच्याबद्दल होती.
विवेक बिंद्रा हे मोठे युट्यूबर नाही तर बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडचे CEO आणि संस्थापक देखील आहेत. विवेक बिंद्राच्या या स्कॅम प्रकरणाला उत्तर देण्यासाठी संदीप माहेश्वरीनी अनेक पोस्ट देखील केल्या आहेत.
विवेक बिंद्रा यांनी या प्रकरणावर स्पष्ट मत व्यक्त केले आहे की, संदीप माहेश्वरी यांनी मला त्यांच्या शोमध्ये आमंत्रित करावे, युजर्सच्या मनात माझ्याबद्दल जे काही प्रश्न असतील ते तिथे सोडवण्यात येतील.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.